भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदी निवड पक्की झाली. गांगुलीविरोधात अध्यक्षपदासाठी कोणीही अर्ज न भरल्यानं ही निवडणुक बिनविरोध झाली. नाट्यमय घडामोडीनंतर गांगुलीला हे अध्यक्षपद मिळाले आहे. गांगुलीच्या रुपानं 65 वर्षांनंतर भारतीय कर्णधार बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. गांगुलीची निवड निश्चित झाल्यानंतर माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनं हटके शैलीत दादाचे अभिनंदन केले.
त्याने लिहिले की,''अभिनंदन दादा. देर है अंधेर नही.. भारतीय क्रिकेटमध्ये सकारात्मक पाऊल. भारतीय क्रिकेटसाठी तू बरंच योगदान दिले आहेस आणि त्यात अधिक भर पडेल, याची खात्री आहे.''
माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यानेही गांगुलीचं अभिनंदन केले होते. तो म्हणाला,''बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्याबद्दल गांगुली तुझे अभिनंदन. तुझ्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यश मिळवले आणि येथेही तू त्याचीच पुनरावृत्ती करशील याची खात्री आहे. नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा.''
BCCIच्या मुख्यालयात सौरव गांगुलीला आवरला नाही 'त्या' फोटोसोबत सेल्फी घेण्याचा मोह!अध्यक्षपदासाठीचा अर्ज भरण्यासाठी गांगुली सोमवारी बीसीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयात दाखल झाला. यावेळी निवड पक्की होताच गांगुलीनं आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर मुख्यालयातील एका फोटोसोबत त्यानं सेल्फी काढून जुन्या सहकाऱ्यांसोबत हा आनंद साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला. असा कोणता फोटो आहे की त्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह गांगुलीला आवरला नाही?
अध्यक्षपदावर निवड होताच गांगुली बीसीसीआयच्या मुख्यालयातील दुसऱ्या माळ्यावर गेला आणि तेथील एका फोटोसोबत सेल्फी काढली. या फोटोत गांगुलीसोबत सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड हे जुने सहकारी दिसत आहेत. त्यांच्यासोबत गांगुलीनं मैदानावर अनेक आनंदाचे क्षण साजरे केले आणि अध्यक्षपदाचा आनंदही त्याला त्यांच्यासोबत साजरा करावासा वाटला. पण, सध्यातरी त्यानं हे स्वप्न जुन्या सहकाऱ्यांच्या फोटोसोबत पूर्ण केले.
Web Title: ‘Der hai andher nahi’: Virender Sehwag’s congratulatory message for Sourav Ganguly
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.