Join us  

IPL 2021: शून्यावर बाद होऊनही ‘धोनी’च लीडर

MS Dhoni in IPL 2021: सामन्यांबाबतच नाही तर शून्यावर बाद होऊनही धावांबाबत धोनीच लीडर आहे. आयपीएलमध्ये चार हजारापेक्षा अधिक धावा ज्या फलंदाजांनी केल्या आहेत त्यात धोनी सर्वात कमी म्हणजे फक्त चार वेळा शून्यावर बाद झाला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 10:39 PM

Open in App

-ललित झांबरेआयपीएलमध्ये (IPL) अगदी क्वचितच घडते अशी घटना शनिवारी वानखेडे स्टेडीयमवर घडली. महेंद्रसिंग धोनी (Dhoni)  शून्यावर बाद झाला. खाते खोलण्याआधीच दिल्ली कॅपिटल्सच्या आवेश खान (Avesh Khan) त्याचा त्रिफळा उडवला. आयपीएलच्या आपल्या तब्बल २०५ सामन्यांमध्ये तो केवळ चौथ्यांदाच शून्यावर बाद झाला. एवढ्या सामन्यात सर्वात कमी वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम अजुनही धोनीच्याच नावावर आहे. आयपीएलमध्ये १८० च्यावर सामने खेळलेले जे खेळाडू आहेत त्यात धोनीच सर्वात कमी वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्यानंतर रवींद्र जडेजा हा १८५ सामन्यात ६ वेळा शून्यावर बाद झाला आहे.सामन्यांबाबतच नाही तर शून्यावर बाद होऊनही धावांबाबत धोनीच लीडर आहे. आयपीएलमध्ये चार हजारापेक्षा अधिक धावा ज्या फलंदाजांनी केल्या आहेत त्यात धोनी सर्वात कमी म्हणजे फक्त चार वेळा शून्यावर बाद झाला आहे. धोनीच्या नावावर आयपीएलमध्ये २०५ सामन्यांत ४६३२ धावा आहेत. आयपीएलमध्ये चार हजारांच्या धावा करणाऱ्या फलंदाजांची शून्यावर बाद होण्याचे प्रमाण असे (शून्य -फलंदाज-धावाया क्रमाने)४-- महेंद्रसिंग धोनी--४६३२६-- विराट कोहली-- ५९११७-- डेव्हिड वॉर्नर --- ५२५४७-- ख्रीस गेल ------ ४७७२७-- रॉबिन उथप्पा-- ४६०७८-- सुरेश रैना ----- ५४२२९-- एबीडी विलीयर्स- ४८९७१०- शिखर धवन ---५१९७१२- गौतम गंभीर --- ४२१७१३- रोहित शर्मा---- ५२४९

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल २०२१