कराची : त्याच्या पायाला दुखापत झाली होती... त्याला सरळ उभेही राहता येत नव्हते, या अवस्थेत मैदानात जाऊन खेळण्याचा विचारही कोणी करू शकत नाही. पण संघ अडचणीत सापडला होता. संघाला विजयासाठी आपली गरज आहे, हे त्याने जाणले. आपल्या दुखापतीची त्याने पर्वाही केली नाही. तो मैदानात उतरला आणि खणखणीत दोन षटकार लगावले, त्याचबरोबर एक चैाकारही खेचला. फक्त 4 चेंडूंमध्ये 16 धावा फटकावत त्याने संघाला विजय मिळवून दिला. दुखापतग्रस्त असूनही संघाला विजय मिळवून देत आदर्श निर्माण केला आहे तो डॅरेन सॅमीने.पाकिस्तान सुपर लीगमधील पेशावर जल्मी संघाचा सॅमी हा कर्णधार आहे. या लीगमध्ये त्यांचा सामना क्वेटा ग्लॅडीएटर संघाबरोबर होता. या सामन्यात क्वेटा संघाची पहिली फलंदाजी होती. तेव्हा सॅमीने त्यांच्या दोन फलंदाजांना बाद केले होते. पेशावरने 20 षटकांत आठ विकेट्सच्या मोबदल्यात 141 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना क्वेटाचा संघ अडचणीत सापडला होता.सॅमीला मैदानात उतरताना सरळ उभेही राहता येत नव्हते. पण सॅमी फलंदाजीला उतरला. फंलंदाजीला आल्यावर तो फक्त चारच चेंडू खेळला. पण या चार चेंडूंमध्ये त्याने दोन षटकार आणि एक चैाकार लगावला. या सॅमीच्या खेळीमुळे पेशावर संघाने पाच विकेट्स आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. अष्टपैलू कामगिरी केल्यामुळे सॅमीला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- दुखापत असूनही तो मैदानात उतरला आणि दोन षटकार लगावत विजयाला घातली गवसणी
दुखापत असूनही तो मैदानात उतरला आणि दोन षटकार लगावत विजयाला घातली गवसणी
तो मैदानात उतरला आणि खणखणीत दोन षटकार लगावले, त्याचबरोबर एक चैाकारही खेचला. फक्त 4 चेंडूंमध्ये 16 धावा फटकावत त्याने संघाला विजय मिळवून दिला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 17:21 IST
दुखापत असूनही तो मैदानात उतरला आणि दोन षटकार लगावत विजयाला घातली गवसणी
ठळक मुद्दे आव्हानाचा पाठलाग करताना क्वेटाचा संघ अडचणीत सापडला होता. सॅमीला मैदानात उतरताना सरळ उभेही राहता येत नव्हते. पण सॅमी फलंदाजीला उतरला.