Join us  

भारतीयांचा ‘क्लीन स्वीप’चा निर्धार

महिला क्रिकेट : आज इंग्लंडविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 6:32 AM

Open in App

मुंबई : आधीच मालिका खिशात घातलेला भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध गुरुवारी होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात बाजी मारुन ३-० असा ‘क्लीन स्वीप’करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला ६६ धावांनी धूळ चारल्यानंतर दुसºया एकदिवसीय सामन्यात ७ बळींनी पराभूत केले होते. या जोरावर भारताने आयसीसी महिला चॅम्पियनशिपमध्ये ४ गुणांची कमाई केली. भारताला याचा लाभ २०२१ च्या विश्वचषकाची थेट पात्रता मिळविण्यासाठी होऊ शकतो.

प्रशिक्षक डब्ल्यू.व्ही. रमण यांच्या मार्गदर्शनात भारत विजयी मार्गावर परतला असून सलामीवीर स्मृती मानधना उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अनुभवी मितालीने दोन सामन्यात अनुक्रमे ४४ व ४७ धावा केल्या. पूनम राऊतनेही मधल्या फळीत योगदान दिले असून जेमिमा रॉड्रिग्जचे मोलाचे योगदान राहिले. दीप्ती शर्मा, मोना मेश्राम व यष्टिरक्षक तानिया भाटिया यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

गोलंदाजीत अनुभवी झुलन गोस्वामी, शिखा पांडे, दीप्ती शर्मा, पूनम यादव व एकता बिश्त यांनी जबाबदारी चोखपणे बजावली आहे.अष्टपैलू सोफी एकलेस्टोन दुखापतीमुळे दौºयाबाहेर गेली आहे. यामुळे संघात योग्य ताळमेळ साधण्याचे आव्हान इंग्लंडपुढे आहे.प्रतिस्पर्धी संघभारत : मिताली राज (कर्णधार), झुलन गोस्वामी, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ति शर्मा, तानिया भाटिया, आर. कल्पना, मोना मेश्राम, एकता बिश्त, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, शिखा पांडे, मानसी जोशी, पूनम राऊत आणि हरलीन देओल.

इंग्लंड : हीथर नाईट (कर्णधार), टॅमी ब्यूमोंट, कॅथरीन ब्रंट, केट क्रॉस, सोफिया डंकले, सोफी एकलेस्टोन, जॉर्जिया एल्विस, एलेक्स हार्टले, एमी जोन्स, लारा मार्श, नताली सायव्हर, आन्या श्रुबसोल, सारा टेलर, लॉरेन विनफील्ड आणि डेनी वॅट.

टॅग्स :महिला