Join us

नॅशनल ड्युटी संपली; या मंडळींनी गंभीरचं वक्तव्य घेतलं मनावर; पण KL राहुलनं मागितला ब्रेक

विजय हजारे ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या वनडे स्पर्धेतून लोकेश राहुलनं मागितला ब्रेक; कारण गुलदस्त्यातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 12:08 IST

Open in App

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यावर देवदत्त पडिक्कल आणि प्रसिद्ध कृष्णा हे दोन स्टार क्रिकेटर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. ही जोडी कर्नाटककडून विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. दुसरीकडे भारताचा स्टार खेळाडू लोकेश राहुलनं मात्र कर्नाटकसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यापेक्षा विश्रांती घेण्याला पसंती दिल्याचे वृत्त आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

केएल राहुलनं मागितला ब्रेक; त्याच्याशिवाय ही मंडळी देशांतर्गत वनडे खेळण्यात आहेत तयार

लोकेश राहुलसह देवदत्त पडिक्कल आणि प्रसिद्ध कृष्णा ही तिघेही बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाचा भाग होती. देवदत्त पडिक्कल याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. लोकेश राहुल प्रत्येक सामन्यात मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे प्रसिद्ध कृष्णाला अखेरच्या कसोटी सामन्यात संधी मिळाली होती. लोकेश राहुलनं ब्रेक मागितला असला तरी त्यानं यामागच कारण स्पष्ट केलेले नाही. कर्नाटक आणि बडोदा यांच्यातील क्वार्टर फायनल लढतीत प्रसिद्ध कृष्णासह देवदत्त पडिक्कल खेळताना दिसू शकते. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियासोबत असलेल्या या दोघांच्या नावाचीही चर्चा

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यासाठी तयार असलेल्या खेळाडूंच्या यादीत अभिमन्यू  ईश्वरन आणि वॉशिंग्टन सुंदर या नावांचीही चर्चा आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाचा भाग राहिलाला अभिमन्यू बंगालकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळू शकते. दुसरीकडे तामिळनाडूचा संघ सेमीफायनमध्ये पोहचला तर या संघात वॉशिंग्टन सुंदरची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळेल.

गंभीरचं ते वक्तव्य  लोकेश राहुलनं मनावर नाही घेतलं?

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ असा पराभव स्विकारावा लागल्यावर टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर याने रेड बॉल खेळणाऱ्या प्रत्येकानं देशांतर्गत क्रिकेटवर फोकस करायला हवा, असे वक्तव्य केले होते. ही गोष्ट लोकेश राहुलनं मनावर घेतलेली नाही, असा प्रश्न आता निर्माण होताना दिसतोय. इंग्लंड विरुद्धची वनडे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडल्या जाणाऱ्या संघात त्याची वर्णी लागणार असल्याचीही चर्चा देखील आहे. देशांतर्गत क्रिकेटपासून दूर राहण्यामागचं हे देखील एक कारण असू शकते.   

 

टॅग्स :विजय हजारे करंडकभारतीय क्रिकेट संघलोकेश राहुलभारतीय क्रिकेट संघ