Join us  

मोठा निर्णय : 53 चेंडूंत 222 धावा, आफ्रिकेच्या फलंदाजासाठी न्यूझीलंडनं तोडला नियम

न्यूझीलंड क्रिकेट मंडळानं शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हॉन कोनवे याला करारबद्ध केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 2:44 PM

Open in App

न्यूझीलंड क्रिकेट मंडळानं शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हॉन कोनवे याला करारबद्ध केलं. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाकडून करार मिळवण्यासाठी परदेशातील खेळाडूनं किमान तीन वर्ष न्यूझीलंडमध्ये राहणे बंधनकारक आहे. पण, डेव्हॉनसाठी न्यूझीलंडनं हा नियम मोडला आणि आफ्रिकेत जन्मलेल्या डेव्हॉनला करारबद्ध केलं.  28 वर्षीय खेळाडू ऑगस्टपर्यंत संघ निवडीसाठी पात्र ठरणार नाही, परंतु तो करारबद्ध 20 खेळाडूंमध्ये असणार आहे. त्याच्या कामगिरीकडे दुर्लक्ष न करण्याची भूमिका संघाचे प्रशिक्षक गेव्हीन लार्सन यांनी घेतली आहे.

सौरव गांगुलीच्या घरी सचिन तेंडुलकरचा 'लज्जतदार' पाहुणचार!

डेव्हॉननं गतवर्षी प्लंकेट शील्ड क्रिकेट स्पर्धेत वेलिंग्टन संघाचे प्रतिनिधित्व करताना कँटरबेरी संघाविरुद्ध नाबाद 352 धावांची खेळी केली होती. त्यात 48 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. त्याचाच अर्थ त्यानं केवळ 53 चेंडूंत 222 धावा चोपल्या. याव्यतिरिक्त त्यानं 6 जानेवारीला सुपर स्मॅश स्पर्धेत 49 चेंडूंत नाबाद शतक ठोकलं. डावखुला फलंदाज 2017पासून न्यूझीलंडमध्ये राहत आहे आणि त्यानं येथील स्थानिक स्पर्धांमध्ये तीनही फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. 

याशिवाय भारताविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडू कायले जेमिन्सन आणि फिरकीपटू अजाज पटेल यांनाही एलिट गटात सहभागी करून घेतले आहे. कॉलिन मुन्रो आणि जीत रावल यांना मात्र बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.  

न्यूझीलंडनं करारबद्ध केलेले खेळाडू - टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कोनवे, कॉलिन डी ग्रँडहोम, ल्युकी फर्ग्यूसन, मार्टिन गुप्तील, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, जेम्स निशॅम, अजाज पटेल, मिचेल सँटनर, इश सोढी, टीम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीदे वॉलिंग, केन विलियम्सन, विल यंग.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

रवी शास्त्रींची रोखठोक भूमिका; आधी आयपीएल, स्थानिक क्रिकेट सुरू व्हायला हवं, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप नंतर!

IPL 2020 न झाल्यास भारतीय खेळाडूंना बसेल मोठा धक्का? सौरव गांगुलीनं दिले संकेत

Video : सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा अन् हरभजन सिंग यांना युवराज सिंगचं चॅलेंज

Video : दिग्गज बॉक्सर मेरी कोमच्या घरी अचानक आले दिल्ली पोलीस अन्...

शाहिद आफ्रिदीचं जलद शतक अन् सचिन तेंडुलकरची बॅट; काय आहे नेमकं कनेक्शन?

टॅग्स :न्यूझीलंडद. आफ्रिका