Join us  

Dewald Brevis CSA T20: Baby AB डेवाल्ड ब्रेव्हिसचा धुमधडाका! १३ फोर, १३ सिक्स... T20 मध्ये कुटल्या १६२ धावा

डेवाल्ड ब्रेव्हिस IPLमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 8:47 PM

Open in App

Dewald Brevis: CSA T20 Challenge 2022-23 मध्ये सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिस म्हणजेच Mumbai Indians चा बेबी एबी (Baby AB) याने झंझावाती शतक ठोकले. टायटन्सकडून खेळताना ब्रेव्हिसने पॉचेफस्ट्रूममधील सेनवेस पार्क येथे नाइट्सविरुद्ध ५७ चेंडूंचा सामना केला आणि २८४.२१ च्या स्ट्राइक रेटने १६२ धावा कुटल्या. या दरम्यान त्याने अवघ्या ३५ चेंडूत शतक पूर्ण केले. डेवाल्ड ब्रेव्हिसने १३ चौकार आणि १३ षटकार ठोकले. म्हणजेच त्याने १३० धावा या केवळ २६ चेंडूंमध्ये केवळ चौकार आणि षटकारांच्या साथीने ठोकल्या. १९ वर्षीय ब्रेव्हिसचे हे पहिलेच टी२० शतक ठरले.

बेबी एबी डेवाल्ड ब्रेव्हिसच्या खेळीच्या जोरावर टायटन्सने ३ गडी गमावून २७१ धावा केल्या. टी२० क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही संघाची ही चौथी सर्वोच्च धावसंख्या ठरली. नाइट्सने सात गोलंदाजांचा वापर केला, परंतु ब्रेव्हिस साऱ्यांसमोर वरचढ ठरला. अखेर डावाच्या २०व्या षटकात त्याला गेराल्ड कोएत्झीच्या गोलंदाजीवर बाद करण्यात प्रतिस्पर्ध्यांना यश आले.

T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक खेळी खेळण्याच्या बाबतीत ब्रेव्हिसने संयुक्त तिसऱ्या स्थानावर धडक मारली. त्याच्या आधी झिम्बाब्वेच्या हॅमिल्टन मसाकात्झा आणि हजरतुल्ला झझाईने टी२० क्रिकेटमध्ये नाबाद १६२ धावा केल्या आहेत. या यादीत ख्रिस गेल नाबाद १७५ धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे आणि अॅरोन फिंच दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १७२ धावा केल्या आहेत. ब्रेव्हिस बेबी एबी म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची खेळी पाहून दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलियर्सनेही त्याचे कौतुक केले आहे.

--

दरम्यान, ब्रेव्हिसच्या १७२ धावांशिवाय जिवेशान पिल्लायने ५२ धावांची खेळी केली. तर डिन्होव्हान फरेराने ३३ धावा केल्या. त्यामुळे त्यांनी प्रथम फलंदाजी करत ३ बाद २७१ धावा केल्या.

टॅग्स :टी-20 क्रिकेटमुंबई इंडियन्सद. आफ्रिकाएबी डिव्हिलियर्स
Open in App