Dewald Brevis, U19 World Cup : 'बेबी एबी'चा मोठा पराक्रम; मोडला १८ वर्ष शिखर धवनच्या नावावर असलेला विश्वविक्रम!

Dewald Brevis, U19 World Cup : १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात आले असले तरी त्यांचा फलंदाज डेवॉल्ड ब्रेव्हिस यानं विश्वविक्रमी कामगिरी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 09:49 AM2022-02-04T09:49:17+5:302022-02-04T09:49:47+5:30

whatsapp join usJoin us
Dewald Brevis, now holds the record for most runs in a single U-19 World Cup over taking Shikhar Dhawan's 505 runs  | Dewald Brevis, U19 World Cup : 'बेबी एबी'चा मोठा पराक्रम; मोडला १८ वर्ष शिखर धवनच्या नावावर असलेला विश्वविक्रम!

Dewald Brevis, U19 World Cup : 'बेबी एबी'चा मोठा पराक्रम; मोडला १८ वर्ष शिखर धवनच्या नावावर असलेला विश्वविक्रम!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Dewald Brevis, U19 World Cup : १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात आले असले तरी त्यांचा फलंदाज डेवॉल्ड ब्रेव्हिस यानं विश्वविक्रमी कामगिरी केली आहे. एबी डिव्हिलियर्सचा ( AB de Villiers) जबरा फॅन असलेला ब्रेव्हिस आता IPL 2022मध्येही धमाका करण्यासाठी सज्ज आहे. पण, आयपीएलपूर्वी त्यानं वर्ल्ड कप स्पर्धा गाजवून साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. गुरुवारी त्याने बांगलादेशविरुद्ध आणखी एक शतकी खेळी करून U19 world cup स्पर्धेत विश्वविक्रम नोंदवला. हा विक्रम १८ वर्ष भारताचा सलामीवीर शिखर धवन ( Shikhar Dhawan) याच्या नावावर होता. 

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत ७व्या स्थानासाठीच्या प्ले ऑफ लढतीत दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश एकमेकांना भिडले. बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २९३ धावा उभ्या केल्या. पण, आफ्रिकेने हे लक्ष्य ४८.५ षटकांत २ विकेट्स राखून पार करताना विजय निश्चित केला. बांगलादेशच्या अरिफुल इस्लामने १०३ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १०२ धावांची खेळी केली. त्याला प्रनतीक नबील ( ३८), एसएम मेहेरोब ( ३६), मोहम्मद फहिम ( ३६) व महफिजुल इस्लाम ( २९) यांची साथ दिली. आफ्रिकेच्या क्वेना मफाकाने तीन विकेट्स घेतल्या.

आफ्रिकेच्या रोनान हेर्मान व ब्रेव्हिस यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली. रोनान ४६ धावांवर बाद झाला. त्यानंतर ब्रेव्हिसनं एकाकी खिंड लढवली. आफ्रिकेचे अन्य फलंदाज झटपट माघारी परतत होते. ७व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मॅथ्यू बोएस्टने २२ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४१ धावां कुटल्या. ब्रेव्हिसने या सामन्यात १३० चेंडूंत ११ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने १३८ धावा केल्या. या कामगिरीसह तो यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत ४०० धावा करणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. त्याच्या नावावर ६ सामन्यांत ८४.३३ च्या सरासरीने ५०६ धावा आहेत. त्यात २ शतकं व ३ अर्धशतकांचा समावेश आहे. 

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका पर्वात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम आता ब्रेव्हिसच्या नावावर नोंदवला गेला आहे. याआधी भारताच्या शिखर धवनने २००४च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत ५०४ धावा केल्या होत्या.  


ब्रेव्हिसची U19 World Cup 2022 मधील कामगिरी
  • ५० धावा ( ७० चेंडू) वि. वेस्ट इंडिज ( सराव सामना) 
  • ६५ धावा ( ९९ चेंडू) वि. भारत
  • १०४ धावा ( ११० चेंडू) व २-१८  वि. यूगांडा
  • ९६ धावा ( १२२ चेंडू) वि. आयर्लंड
  • ९७ धावा ( ८८ चेंडू) व २-४०  वि. इंग्लंड
  • ६ धावा व १-५२ वि. श्रीलंका
  • १३८ धावा वि. बांगलादेश
  • १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत सलग चार सामन्यांत ५०+ धावा करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिला फलंदाज ठरला आहे.  भारताच्या शुबमन गिलनं अशी कामगिरी केली होती आणि त्यानंतर आता ब्रेव्हिसनं हा विक्रम केला 

Web Title: Dewald Brevis, now holds the record for most runs in a single U-19 World Cup over taking Shikhar Dhawan's 505 runs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.