भारतीय संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि लोकिप्रिय डान्स कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्या संसारात मिठाचा खडा पडल्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. दोघांच्यात बिनसल्याची चर्चा गावभर होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची मुद्दा चांगलाच गाजला होता. सोशल मीडियाच्या पोस्टमुळे क्रिएट झालेला तणावूर्ण सीन खोटा असल्याचे दोघांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केले होते. त्यानंतर अनेकदा एका फ्रेममध्ये दोघांनी एकमेकांवरील प्रेमही दाखवून दिलं. पण आता पुन्हा एकदा दोघांच्यातील प्रेम आटल्याची भावना सोशल मीडियावर दाटून आलीये. यावेळी यामागे सोशल मीडियावरील पोस्टच कारणीभूत आहे. फरक फक्त एवढाच की, याआधी धनश्रीच्या पोस्टनं याची सुरुवात झाली होती. यावेळी युजवेंद्र चहलच्या पोस्टमुळे या दोघांच्यातील नात्यात प्रेम उरलं नाही, याची चर्चा रंगू लागलीये.
चहलशिवाय सिंगल फ्रेममध्ये दिसली, अन् चांगलीच फसली
एका बाजूला युजवेंद्र चहलच्या एका पोस्टमुळे आणखी एका क्रिकेटरचा संसार मोडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरु असताना दुसऱ्या बाजूला धनश्रीच्या पोस्टची यात भर पडली आहे. युजवेंद्र चहलच्या पोस्टमधून लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी पत्नी धनश्री त्याच्यासोबत नसल्याची गोष्ट चर्चेत आली होती. यामुळेच दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची गोष्ट चर्चेत आली होती. त्यात धनश्री वर्मानं ख्रिसमस सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यात ती पुन्हा एकदा चहलशिवाय सिंगल फ्रेममध्ये दिसलीये. ती सिंगल फ्रेममध्ये दिसली की, चहल कुठंय? मग लग्न करून तुढा उपयोग काय? वैगेरे वैगेरे कमेंट तिच्या पोस्टवर पाहायला मिळतात. पण यावेळी तिला थेट घटस्फोटाबद्दलच नेटकऱ्यांनी प्रश्न विचारल्याचे दिसते.
"तलाक कन्फर्म कर नौटंकी नको..."
Dhanashree Verma
धनश्री वर्मानं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन जो व्हिडिओ शेअर केलाय त्यात ती आपल्या पाळीव प्राणी असेलल्या श्वानावर प्रेम व्यक्त करत ख्रिसमस सेलिब्रेशनचा आनंद घेताना दिसते. कॉफी असं तिच्या या श्वानाचं नाव आहे. तिने या व्हिडिओमध्येच त्याबद्दल सांगितले आहे. पण तिच्या या व्हिडिओर चहलसोबतच्या मॅटरवर बोल, अशा आशयाच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. "तलाक कन्फर्म कर नौटंकी नको..." या कमेंट्सह सिंगल फ्रेममध्ये स्वत:ला दाखवून नात्यातील दूराव्याच्या चर्चेसंदर्भातील सस्पेन्स न वाढता जे खरंय ते सांगून टाक, अशा अर्थाने सोशल मीडियावर नेटकरी धनश्रीला थेट घटस्फोटासंदर्भात प्रश्न विचारत आहेत.
नेमकं काय सुरुये ते दोघांशिवाय अन्य कुणाला कळणं मुश्किलच
धनश्री वर्मा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. तिच्या पोस्टवर प्रेमळ कमेंट्सशिवाय या आशयाच्या कमेंट्स याआधीही पाहायला मिळाल्या आहेत. एखाद्या पोस्टच्या माध्यमातून दोघांच्यात बिनसल्याची चर्चाही याआधी रंगली आहे. पुढे ती फोलही ठरली. त्यामुळे यावेळी नेमकं काय घडणार? ते धनश्री वर्मा आणि चहल हे या मुद्यावर स्पष्ट बोलल्याशिवाय कळणं मुश्किलच आहे.
Web Title: Dhanashree Verma Celebrates Christmas With Her Beloved Pet Dog Coffee Fan Asks About Divorce With Yuzvendra Chahal
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.