धवनचा शतकी तडाखा, लंकेचा आठ विकेटनं पराभव, मालिकाही खिशात

शिखर धवनच्या शतकी खेळीच्या बळावर तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारतानं श्रीलंकेचा आठ विकेटनं पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 07:55 PM2017-12-17T19:55:40+5:302017-12-17T19:58:00+5:30

whatsapp join usJoin us
Dhawan's century is a tadka, Lanka's eight wickets defeat, series win | धवनचा शतकी तडाखा, लंकेचा आठ विकेटनं पराभव, मालिकाही खिशात

धवनचा शतकी तडाखा, लंकेचा आठ विकेटनं पराभव, मालिकाही खिशात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

विशाखापट्टणम - शिखर धवनच्या शतकी खेळीच्या बळावर तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारतानं श्रीलंकेचा आठ विकेटनं पराभव केला. लंकेनं दिलेल्या 216 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशजनक झाली. काळजीवाहू कर्णधार रोहित वैयक्तिक सात धावांवर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयस अय्यरच्या साथीनं शिखरनं भारताच्या विजयाचा पाया रचला. अय्यरनं 65 धावांची महत्वपुर्ण खेळी केली. श्रेयस अय्यर आणि शिखरनं दुसऱ्या विकेटसाठी 135 धावांची निर्णायक भागीदारी केली. अय्यर बाद झाल्यानंतर धवनने कार्तिकच्या साथीन भारताला विजय मिळवून दिला. शिखर धवननं 85 चेंडूत दमदार शतक साजरं केलं. दिनेश कार्तिकनं 26 धावांची खेळी केली. 

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करताना उपुल थरंगाच्या 95 धावांच्या बळावर श्रीलंकेनं 44 षटकांत सर्वबाद 215 धावांपर्यंत मजल मारली. एकवेळ श्रीलंका 300 धावांचा टप्पा पार करेल असे वाटत असताना भारतीय फिरकीच्या जाळ्यात लंकेचे फलंदाज अडकले. भारताकडून चहल आणि कुलदिपने प्रत्येकी तीन बळी घेतले तर. पांड्यानं दोन आणि भुवनेश्वर व बुमराहनं प्रत्येकी एक- एक विकेट घेतली. उपुल थरंगाशिवाय श्रीलंकेच्या सदिरा समरविक्रमानं 42 धावा केल्या. भारताच्या फिरकीपुढे लंकेच्या इतर फलंदाजांनी नांग्या टाकल्या. 

तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला सुरुवातीलाच धक्का बसला. चौथ्या षटकात धनुष्का गुणतिलका 13 धावांवर बाद झाला.  त्यानंतर उपुल थरंगानं सर्व सुत्रे आपल्या हाती घेत फटकेबाजी सुरु केली. सलामीवीर उपुल थरंगानं हार्दिक पंड्याच्या एकाच षटकात पाच चौकारांची बरसात करत आपला फॉर्म दाखून दिला. थरंगानं 95 (82) धावांची झंझावाती खेळी केली. या खेळीदरम्यान त्यानं तीन षटकार आणि 12 चौकार लगावले. 28 व्या षटकात कुलदिप यादवनं थरंगाचा अडथळा दूर केला. कुलदिपच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्यासाठी ख्रिस सोडून बाहेर जाणाऱ्या थरंगाला महेंद्रसिंग धोनीच्या चपळ यष्टीरक्षणामुळे 95 धावांवर बाद व्हाव लागलं. थरंगानंतर त्याच षटकात कुलदिपनं निरोशन डिकवेला 8 धावांवर बाद करत सामन्यात भारताची बाजू मजबूत केली. अनुभवी मॅथ्यूजही फार कमाल दाखवू शकला नाही. चहलच्या गोलंदाजीवर मॅथ्यूज (17) धावांवर बाद झाला.  
 

Web Title: Dhawan's century is a tadka, Lanka's eight wickets defeat, series win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.