नवी दिल्ली : आव्हानात्मक परिस्थितीमध्ये ज्यावेळी जबाबदारी स्वीकारण्याची वेळ येते त्यावेळी माजी भारतीय कर्णधार पुढाकार घेत ती स्वीकार करतो, असे मत आपले जास्तीत जास्त क्रिकेट धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने व्यक्त केले.
हा ३१ वर्षीय वेगवान गोलंदाज चेन्नई सुपरकिंग्स व भारतातर्फे धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. त्याला यावेळी दिल्ली कॅपिटल्सतर्फे खेळायचे होते. पण कोरोना महामारीमुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आले आहे.
मोहितने म्हटले की,‘मी ज्या खेळाडूंसोबत खेळलो त्यात विनम्रता व कृतज्ञतेची भावना यामुळे धोनी सर्वांत वेगळा आहे. एक कर्णधार व नेतृत्वकर्ता यांच्यामध्ये फरक असतो आणि माझ्या मते धोनी खरा नेतृत्वकर्ता आहे. ज्यावेळी संघ विजय मिळवतो त्यावेळी त्याचे श्रेय तो स्वत: कधीच घेत नाही. पण ज्यावेळी संघ पराभूत होतो त्यावेळी तो सर्व जबाबदारी स्वीकारतो. हे चांगल्या नेतृत्वकर्त्याचे गुण आहे आणि त्यामुळेच मी त्याच्यापासून अधिक प्रभावित आहो.’कोरोना व्हायरसमुळे क्रीडा स्पर्धा ठप्प आहेत आणि मोहितने म्हटले की, ज्यावेळी आयपीएल खेळले जाईल त्यावेळी आमचा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार राहील. पाठीच्या दुखापतीमुळे गेल्या १० महिन्यापासून क्रिकेटपासून दूर असलेला मोहित म्हणाला, ‘मी शेवटी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या तीन महिन्यात फिटनेसवर लक्ष दिल्यानंतर आता खऱ्या अर्थाने दिल्लीतर्फे खेळण्यासाठी उत्साहित आहो. आमचा संघ मजबूत आहे.
Web Title: Dhoni accepts responsibility for defeat: Mohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.