गल्लीतला गोंधळ सेहवागमुळं दिल्लीत पोहोचला, गावकऱ्यांनी स्पष्टपणे नाकारला

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा यांच्या चाहत्यांमध्ये आयपीएल सामन्यांत चांगलीच खुन्नस पाहायला मिळते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 02:00 PM2020-08-23T14:00:22+5:302020-08-23T18:31:14+5:30

whatsapp join usJoin us
Dhoni and Rohit Sharma's fans clashed against each other, Sehwag tweeted | गल्लीतला गोंधळ सेहवागमुळं दिल्लीत पोहोचला, गावकऱ्यांनी स्पष्टपणे नाकारला

गल्लीतला गोंधळ सेहवागमुळं दिल्लीत पोहोचला, गावकऱ्यांनी स्पष्टपणे नाकारला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेतली. आता तो इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल 2020) जोरदार फटकेबाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे यंदाची आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी सहा संघ दुबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे, क्रिकेट चाहत्यांना आता आयपीएलचे वेध लागले आहेत. मात्र, कोल्हापूरात आयपीएल टीमच्या चाहत्यांमध्ये धोनी अन् रोहित शर्मा यांच्यावरुन हाणामारी झाल्याचे वृत्त पसरले होते. पण, अशी घटना कुठेही घडली नाही, असे कुरुंदवाडमधील नागरिकांनी सांगितले आहे. 

दरम्यान, या घटनेची माहिती टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने ट्विट करुन असे न करण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे. सेहवागने ट्विट करत, क्या करते रहते हो पागलो... खेळाडू एकमेकांना आवडतात, फार तर जास्त बोलत नाहीत. आपल्या कामाशी काम ठेवतात. पण, काही फॅन्स वेडेच आहेत. भांडणं नका करू, भारतीय संघाला लक्षात ठेवा, असे म्हणत सेहवागने वाद न करण्याचं आवाहन केलंय. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्स ( सीएसके) संघही शुक्रवारी रात्री दुबईत दाखल झाला. तर, रोहित शर्माही आपल्या संघासोबत दुबईला पोहोचला आहे. पुढील महिन्यात आयपीएल सामन्यांना सुरुवात होणार आहे.

धोनीने 15 ऑगस्ट रोजी आपल्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी कुरुंदवाड धोनीचा बॅनर झळकावला. तर, शनिवारी रोहित शर्माला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रोहितच्या चाहत्यांनीही बॅनरबाजी केली. पण, रोहितच्या अभिनंदनाचे लावलेल्या होर्डिंग्जची अज्ञाताने फाडाफाडी केली. त्यामुळे या चाहत्यांच्या गटातील धुसफूस आणखी वाढली. होर्डिंग्ज फाडाफाडी केल्याचा कारणावरून रोहित शर्माचा फॅन असलेल्या तरुणाने राग व्यक्त करत शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर शिवीगाळ करणाऱ्या चाहत्याला उसाच्या मळ्यात नेऊन चोप दिल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, कुरुंदवाडमधील धोनी व रोहितच्या चाहत्यांनी याबाबत खुलासा केला असून असे काही घडले नसल्याचे म्हटले आहे.

कुरुंदवाड शहर हे संपुर्ण महाराष्ट्रात एकोप्याचे शहर म्हणून ओळखले जाते. एका वृत्तपत्रात चुकीची बातमी लागली की फलक लावल्यामुळे मारहाणीची घटना घडली, पण अशी घटना कुठेही घडली नाही, हे सिद्ध झाले आहे, असे धोनी व रोहितच्या चाहत्यांनी म्हटले आहे. याचबरोबर, धोनी आणि रोहितच्या चाहत्यांमध्ये फलक लावण्यावरून कोणताही वाद किंवा मारहाण झालेली नाही, असे पोलीस निरीक्षक निरावडे यांनी सांगितले आहे.

 

Web Title: Dhoni and Rohit Sharma's fans clashed against each other, Sehwag tweeted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.