मुंबई - बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आज 52 वर्षांचा झाला आहे. सलमान खानने मंगळवारी रात्री आपल्या काही खास मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. सलमानच्या वाढदिवसाला अनेक सेलिब्रेटिंनी हजेरी लावली. मात्र मंगळवारी रात्री विरुष्काचं रिसेप्शनही असल्या कारणाने अनेक सेलिब्रेटी तिथे व्यस्त होते. पण काहीजणांनी दोन्ही ठिकाणी हजेरी लावणं पसंद केलं. यामधील एक नाव म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी.
महेंद्रसिंग धोनीने सर्वात आधी आपल्या कुटुंबासोबत विराट - अनुष्काच्या रिसेप्शनमध्ये सहभागी झाला आणि नंतर सलमानच्या बर्थडे पार्टीसाठी पनवेलला रवाना झाला. सलमान खानने खास मित्रांसाठी पनवेलमधील आपल्या फार्महाऊसवर पार्टी आयोजित केली होती. विराट - अनुष्काच्या रिसेप्शन पार्टीत कतरिना कैफही सहभागी झाली होती. तिनेदेखील सलमानच्या वाढदिवसाला हजेरी लावण्यासाठी पनवेल गाठलं. सलमान खान आणि कतरिनाचा 'टायगर जिंदा है' चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दूर गेलेले हे दोघे पुन्हा एकदा जवळ आले आहेत. बॉक्स ऑफिसवर 'टायगर जिंदा है' धुमाकूळ घालत असून 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
विराट - अनुष्काच्या रिसेप्शनमध्ये कुटुंबासोबत आलेला महेंद्रसिंग धोनी सलमान खानच्या पार्टीत पत्नी साक्षीसोबत आला होता. धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. जानेवारीत आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची त्याची इच्छा आहे. फेब्रुवारी महिन्यात दक्षिण अफ्रिकेविरोधात खेळल्या जाणा-या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत महेंद्रसिंग धोनी खेळताना दिसणार आहे.
Web Title: Dhoni attends Salman's Birthday party
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.