कोलंबो, दि. 24 - दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 231 धावांचा पाठलाग करताना लंकेच्या धनंजयाने भारताच्या आघाडीच्या सहा फलंदाजांना बाद करत सामन्यात रंगत निर्माण केली. पावसाच्या व्यत्ययामुळे मिळालेल्या सुधारित आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या सलामिवीर फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. शिखर-रोहित जोडीनं पहिल्या विकेटसाठी 109 धावांची भागिदारी केली. पण धनंजयाने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे भारताच्या विजयाच्या आशा संपल्या होत्या. एकवेळ एक बाद 109 अशा सुस्थितीत असणाऱ्या भारताचा डाव धनंजयाच्या गोलंदाजीपुढे गडाडाला. रोहित शर्मा, विराट, राहुल, जाधव, पांड्या आणि अक्षर पटेल धनंजयाच्या फिरकीच्या जाळ्यात आडकले. आणि एकापाठोपाठ आपल्या विकेट बहाल केल्या. अकिला धनंजयाने भारतीच्या तगड्या फलंदाजीला खिंडार पाडले. अकिला धनंजयाने भारताच्या सहा गड्यांना बाद करत लंकेला विजयासाठीच्या आशा वाढवल्या पण धोनी आणि भुवनेश्वरने केलेल्या संयमी फलंदाजीच्या बळावर भारताने विजय मिळवला.
भुवनेश्वर कुमार एकदिवसीयने करियरमधील पहिले अर्धशतक झळकावले. धोनी आणि भुवनेश्वरकुमारने आठव्या विकेटसाठी शंभर धावांची भागिदारी केली. धोनीनं संयमी खेळी करताना नाबाद 45 धावां केल्या. तर भुवनेश्वरने नाबाद 53 धावांची खेळी केली.
त्यापूर्वी, भारताने नाणेपेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकात आठ बाद 236 धावा केल्या. श्रीलंकेकडून सिरीवरदनाने सर्वाधिक (58) धावांची अर्धशतकी खेळी केली. सिरीवरदना आणि कपुगेंदरामध्ये सातव्या विकेटसाठी झालेल्या 91 धावांच्या भागीदारीमुळे श्रीलंकेला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. कपुगेंदराने (40) धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार विकेट घेतल्या. यजुवेंद्र चहलने दोन तर, हार्दिक पांडया आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक गडी बाद केला. पाल्लीकल येथे भारत आणि श्रीलंकेमध्ये दुसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. सलामीवीर डिकवेला (31), गुणतालिका (19) आणि उपुल थरंगा (9) धावांवर बाद झाले. बुमराहने डिकवेलाला (31) धवनकरवी झेलबाद केले तर, गुणतालिकाला (19) चहलच्या गोलंदाजीवर धोनीने यष्टीचीत केले. हार्दिक पटेलच्या गोलंदाजीवर थरंगाने (9) स्लीपमध्ये कोहलीच्या हातात सोपा झेल दिला.
भारत आणि श्रीलंकेमध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना होत असून, भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कसोटी मालिकेत ३-० ने ‘क्लीन स्विप’ करणा-या भारतीय संघाने पहिली वन डेदेखील नऊ गडी राखून सहज जिंकली होती.