Join us  

स्वातंत्र्यदिनी धोनी लेहमध्ये फडकवणार तिरंगा ?

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 31 जुलैला धोनी काश्मीर खोऱ्यातील 106TA बटालियन (पॅरा) सोबत रूजू झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 1:35 PM

Open in App

जम्मू-काश्मीर : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 31 जुलैला काश्मीर खोऱ्यातील 106TA बटालियन (पॅरा) सोबत रूजू झाला होता. तसेच 15 ऑगस्ट पर्यंत तो बटालियनसोबत राहणार आहे. भारतीय सैन्याची सेवा करता यावी यासाठी धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती घेतली आहे.

त्यातच महेंद्रसिंग धोनी येत्या 15 ऑगस्टला लडाखमधील लेह येथे झेंडावंदन करण्याची शक्यता असल्याचे समजते. तसेच धोनी भारतीय सेनेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असून युनिटमधील सदस्यांना तो प्रेरित करतो असे भारतीय सेनेच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

धोनी ज्या बटालियनमध्ये सहभागी होऊन पहारा देत आहे, ती बटालियन विशेष सैनिकांची आहे. धोनीला येथे दिवस आणि रात्र अशा शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. यावेळी धोनीकडे पाच किलो वजनाच्या 3 मॅग्जीन, 3 किलोचे पोशाख, 2 किलोची बूटं, 4 किलोचे 3 ते 6 ग्रेनेड, 1 किलोचे हॅल्मेट आणि 4 किलोचे बुलेटप्रुफ जॅकेट असे एकूण 19 किलो वजन असणार आहे. धोनी यावेळी 50-60 सैनिकांसोबत बंकरमध्ये राहणार आहे. 38 वर्षीय धोनी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असून, त्याच्याकडे लेफ्टनंट कर्नलपद आहे. 2011साली भारतीय लष्करानं त्याला हा मान दिला. 2015मध्ये त्यानं पॅराट्रुपरची परीक्षाही पास केली.   

 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय जवान