Join us  

धोनीने एक फोन केला अन् अजिंक्य रहाणे भारतीय संघात आला!

मुख्य कोच राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यातील  फोन कॉलमुळे रहाणेसाठी पुन्हा एकदा टीम इंडियाची दारे उघडली गेली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 5:27 AM

Open in App

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अनेक माजी खेळाडूंच्या कारकिर्दीला पुनरुज्जीवन दिले आहे. धोनी कर्णधार असतानाही  तो विश्वास  असलेल्या खेळाडूला भरपूर संधी द्यायचा. त्याचा आत्मविश्वास वाढवायचा. आता कर्णधार नसला तरी त्याचा सल्ला अजूनही अनेक लोक घेतात. त्याचाच लाभ माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेला झाला. मुख्य कोच राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यातील  फोन कॉलमुळे रहाणेसाठी पुन्हा एकदा टीम इंडियाची दारे उघडली गेली.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की,  श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यापासून रहाणे संघ व्यवस्थापनाच्या योजनेचा एक भाग बनला. त्याला इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. यंदा रणजी करंडकात उपयुक्त खेळी करताना पाहिल्यामुळे द्रविडने धोनीकडे अजिंक्यसाठी विचारणा केली.’

दुसरीकडे सर्फराज खानने निवड समितीवर दबाव वाढविला. मात्र, आयपीएलमध्ये त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. सूर्यकुमार यादवलादेखील फारशी चमक दाखविता आली नाही. अजिंक्यने आयपीएलमध्ये उत्तम स्ट्राइक रेटने धावा करत फॉर्म सिद्ध केला. धोनीने त्याला त्याच्या स्टाइलने खेळण्याची मुभा दिली होती. ‘माहीच्या नेतृत्वात खेळणे हाच माझ्यासाठी सुखद अनुभव ठरतो,’ असे अजिंक्यने पुनरागमनानंतर म्हटले आहे.

टॅग्स :अजिंक्य रहाणेमहेंद्रसिंग धोनीबीसीसीआय
Open in App