'तो' व्हिडीओ अन् MS Dhoni- रवींद्र जडेजा यांच्या भांडणाची चर्चा; CSKनं सांगितलं सत्य, कॅप्टनच्या दुखापतीबाबत अपडेट्स

रवींद्र जडेजा आणि धोनी यांच्यातील वादावरही विश्वनाथन यांनी सत्य सांगितले. गेल्या वर्षी जडेजाला हंगामाच्या मधोमध कर्णधारपदावरून हटवल्यानंतर या दोघांमध्ये सर्व काही ठीक नसल्याची कुणकुण लागली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 04:34 PM2023-06-21T16:34:08+5:302023-06-21T16:41:36+5:30

whatsapp join usJoin us
'Dhoni never complained about his knee to anybody'; CSK CEO Kasi Viswanathan reflects clarifies he wasn't 'pacifying' Jadeja in viral video | 'तो' व्हिडीओ अन् MS Dhoni- रवींद्र जडेजा यांच्या भांडणाची चर्चा; CSKनं सांगितलं सत्य, कॅप्टनच्या दुखापतीबाबत अपडेट्स

'तो' व्हिडीओ अन् MS Dhoni- रवींद्र जडेजा यांच्या भांडणाची चर्चा; CSKनं सांगितलं सत्य, कॅप्टनच्या दुखापतीबाबत अपडेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

डाव्या गुडघ्यावर दुखापत असूनही महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील सर्व सामने खेळला. आयपीएल २०२३ चे जेतेपद नावावर केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधाराच्या गुडघ्यावर या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत शस्त्रक्रिया झाली आणि तो सध्या त्यातून सावरतोय.  


"आम्ही त्याला कधीच 'तुला खेळायचे आहे की बाहेर बसायचे आहे' असे विचारले नाही. जर त्याला खेळायचे नसते तर त्याने आम्हाला लगेच सांगितले असते," असे CSKचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी ESPNcricinfo तमिळला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. "आम्हाला माहित होते की त्याच्यासाठी खेळणे हा एक संघर्ष होता, परंतु त्याची संघाप्रती असलेली बांधिलकी त्या दृष्टीकोनातून त्याचे नेतृत्व आणि संघाला कसा फायदा होतो हे सर्वांनाच ठाऊक आहे. तुम्हाला त्याचे कौतुक करावे लागेल.'' 


"फायनलपर्यंत, त्याने कधीही त्याच्या गुडघ्याबद्दल कोणाकडेही तक्रार केली नाही. पण, सर्वांना हे माहित होते आणि तुम्ही त्याला धावताना संघर्ष करताना पाहिले असेल, परंतु त्याने एकदाही तक्रार केली नाही. अंतिम फेरीनंतर, तो म्हणाला, 'ठीक आहे, मी शस्त्रक्रिया करून घेईन. त्याची शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे, तो बरा होत आहे,''असेही त्यांनी सांगितले.  


फायनलनंतर धोनीने विजेतेपद जिंकल्यानंतर त्याने निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा टोलावून लावले. शरीराने परवानगी दिल्यास "किमान" आणखी एक हंगाम खेळण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली होती.  “वास्तविक, त्याने आम्हाला सांगितले की अंतिम सामना संपल्यानंतर तो मुंबईला जाईल, शस्त्रक्रिया करेल आणि पुनर्वसनासाठी रांचीला परत जाईल. मुंबईत, ऋतुराजच्या लग्नानंतर [४ जून रोजी], मी त्याला भेटायला गेलो होतो. त्याने सांगितले की तो तीन आठवडे विश्रांती घेईल आणि नंतर त्याचे पुनर्वसन सुरू करेल,” असे विश्वनाथन म्हणाले. 


"काय करायचं, कसं करायचं हे त्याला माहीत आहे, म्हणून आम्ही त्याला 'तू काय करणार आहेस, कसं' वगैरे विचारणार नाही. तो आम्हाला स्वतःहून कळवेल. तो काहीही करत असला तरी तो प्रथम कॉल एन श्रीनिवासन यांना करेल. २००८  पासून हे असेच चालू आहे. हे असेच चालू राहील,"असेही त्यांनी पुढे म्हटले.


रवींद्र जडेजा आणि धोनी यांच्यातील वादावरही विश्वनाथन यांनी सत्य सांगितले. गेल्या वर्षी जडेजाला हंगामाच्या मधोमध कर्णधारपदावरून हटवल्यानंतर या दोघांमध्ये सर्व काही ठीक नसल्याची कुणकुण लागली होती. जडेजाने दुखापतीने कॅम्प सोडल्यानंतर अफवा आणखीनच वाढल्या. "जडेजाचा प्रश्न आहे, तर त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. फलंदाजी करताना, आमचा ऋतुराज, कॉनवे, मोईन, रहाणे यांचा फळी, जेव्हा तो [जडेजा] फलंदाजीला जायचा तेव्हा त्याच्याकडे ५-१० चेंडू शिल्लक होते. अशा परिस्थितीत तो कधी कधी चांगला खेळून जातो किंवा कधी नाही. अशा परिस्थितीत जेव्हा तो बाद व्हायचा तेव्हा जमाव धोनीच्या नावाचा जयघोष करायचे,''असे विश्वनाथन यांनी सांगून जडेजाने व्यक्त केलेल्या नाराजीवर पांघरूण घातले.


"हे सर्व खेळाचा भाग आहे. शेवटच्या सामन्यानंतर, लोकांनी ऑनलाइन व्हिडिओ पाहिले आणि असे मानले की मी जडेजाला शांत करत आहे, पण तसे नव्हते. मी त्याच्याशी सामन्याबद्दल बोलत होतो. इतर कोणतीही चर्चा नाही. धोनीबद्दल त्याला नेहमीच आदर आहे,''असे विश्वनाथन यांनी सांगितले. आयपीएल जेतेपदानंतर जडेजा म्हणाला होता, 'मी ही खेळी धोनीला समर्पित करतो.'  

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: 'Dhoni never complained about his knee to anybody'; CSK CEO Kasi Viswanathan reflects clarifies he wasn't 'pacifying' Jadeja in viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.