अयाज मेमन
महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का दिला. आयपीएल सुरू होण्याआधी त्याने सीएसकेचे नेतृत्व सोडले. शंका घेणारे त्याच्या ‘टायमिंग’वर प्रश्न उपस्थित करतील. त्यांच्या दृष्टीने धोनीचा निर्णय संघासाठी मारक ठरू शकेल. मला मात्र असे वाटत नाही. यामागे धोनीचा वेगळा विचार असावा.
कमालीचा आत्मविश्वास...
धोनी कधीही देखावा करीत नाही. वायफळ चर्चादेखील त्याला पसंत नाही. मनात येईल ते पूर्ण करून शांत बसतो. नंतर पश्चात्ताप करण्यावर त्याचा विश्वास नाही. काही जोखिमेचे निर्णय घेतले, पण संघाला आणि सहकाऱ्यांना सुरक्षित ठेवले.
जडेजा योग्य पर्याय
धोनीचा उत्तराधिकारी म्हणून सीएसकेकडे रवींद्र जडेजा हा बलाढ्य दावेदार होता. आयपीएलमध्ये जडेजाने शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केले. पण सीएकेत आल्यापासून तो भारतीय संघाचा सर्वात भरवशाचा खेळाडू बनला. जडेजाकडे धोनीइतका अनुभव नाही, हे देखील खरे. मात्र त्याच्याकडे धोनीसारखा अनुभवी खेळाडू उपलब्ध आहे. जडेजाच्या आणि संघाच्या यशात धोनी अद्यापही मोलाची भूमिका बजावू शकेल.
n धोनीचा विचार आधुनिक खेळाडूसारखाच आहे. २५ व्या वर्षी टेनिस स्टार ॲश्ले बार्टीने अचानक निवृत्ती जाहीर केली. दोघांचाही विचार मिळताजुळता आहे. बार्टीचा खेळ वैयक्तिक आहे. धोनीचा खेळ मात्र सांघिक असल्याने समूृहाची जबाबदारी ठरते.
कठोर निर्णय घेण्याची क्षमता
काही महिन्याआधी सीएसकेला आयपीएल चॅम्पियन बनविल्यानंतर नेतृत्व सोडणे सोपे नसते. वयाच्या ४१ व्या वर्षी धोनी स्वत:ची क्षमता जाणतो. कुठलाही अहंकार मनात येऊ न देता त्याने कर्णधारपद सोडण्याचा जो कठोर निर्णय घेतला, त्याचे कौतुक व्हायला पाहिजे. सीएसके चारवेळेचा विजेता आहे. याशिवाय दोनदा या संघाने चॅम्पियन्स लीग जिंकली. धोनीच्या यशस्वी नेतृत्वाची ही विशेषता आहे.
(लेखक लोकमतचे कन्सल्टिंग एडिटर आहेत)
Web Title: ... Dhoni should have a different idea behind this, from the writing of Ayaz Memon
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.