नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने स्वाक्षरीयुक्त त्याची बॅट देशातील अव्वल बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याला भेट दिली. ही भेट मिळाल्यानंतर किदाम्बी श्रीकांतचा आनंद गगनात मावेनासा झाला.
श्रीकांत हा धोनीचा चाहता आहे आणि त्याने बीसीसीआयचे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांना धोनीची स्वाक्षरी असणारी बॅट मागितली होती. जगातील माजी नंबर वन खेळाडू श्रीकांतचे वडील केव्हीएस कृष्णा यांनी प्रसादला यष्टिरक्षक बनण्यासाठी प्रेरित केले होते. प्रसाद म्हणाला, ‘‘किदाम्बी श्रीकांत गुंटूर येथील माझ्या बालपणीचे नायक केव्हीएस कृष्णा यांचा मुलगा आहे आणि केव्हीएस कृष्णा यांनीच मला क्रिकेट खेळण्यास प्रेरित केले होते. किदाम्बी हा धोनीचा मोठा चाहता आहे. त्याला माझ्याकडून एमएस धोनीची स्वाक्षरी असलेली बॅटी हवी होती. त्या वेळेस मी त्याला जर तू बॅडमिंटनमध्ये अव्वल रँकिंगला पोहोचल्यास तुला ही भेट मिळेल, असे सांगितले होते.’’ प्रसादने काल हैदराबादस्थित पुलेला गोपीचंद अकॅडमीत श्रीकांतला ही बॅट भेट दिली. जेव्हा धोनीला श्रीकांतच्या इच्छेविषयी सांगितले तेव्हा धोनी आनंदाने त्यासाठी तयार झाला. ते म्हणाले, ‘‘मी श्रीकांतच्या इच्छेविषयी धोनीला सांगितले. धोनी हे ऐकून खूप खूश झाला आणि त्याने आपण स्वत: बॅडमिंटन खेळाडू आहोत आणि भारतीय बॅडमिंटनकडे आपले लक्ष असते असे सांगितले.’’
Web Title: Dhoni signed the signed bat with Kidambi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.