धोनी खऱ्या अर्थाने ठरला ‘मास्टरमाईंड’

एक्स्पर्ट व्ह्यू। लोकप्रियतेत सचिन, विराटलाही टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 05:57 AM2020-09-21T05:57:40+5:302020-09-21T05:58:00+5:30

whatsapp join usJoin us
Dhoni truly becomes 'mastermind' | धोनी खऱ्या अर्थाने ठरला ‘मास्टरमाईंड’

धोनी खऱ्या अर्थाने ठरला ‘मास्टरमाईंड’

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अबूधाबी : तब्बल ४३७ दिवसानी भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक - कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरला. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर पाच गडी राखून मात केली. काल संपूर्ण सामन्यात सोशल मीडियावर चर्चा होती ती धोनीची. वर्षभरानंतर धोनी मैदानावर उतरत असल्यामुळे चाहते उत्साहात होते. त्याने लोकप्रियतेच्या बाबतीत सचिन आणि कोहलीला मागे टाकल्याचे मत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.


‘ज्यावेळी धोनी मैदानावर येतो त्यावेळी एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. प्रेक्षक मैदानात असो की घरात टीव्हीसमोर, सर्वजण धोनीची वाट पाहत असतात. सचिन आणि विराट कोहलीचे चाहते माझ्या या मताशी सहमत असतीलच असे नाही. सचिनचे चाहते तुम्हाला मुंबई आणि कोलकातात सर्वाधिक मिळतील. दिल्ली आणि बंगळुरुत विराटची क्रेझ आहे. परंतु धोनीवर संपूर्ण देशातले चाहते प्रेम करतात.


मुंबईने विजयासाठी दिलेल्या १६३ धावांचा पाठलाग करताना चेन्नईकडून फलंदाजी करण्यासाठी धोनी मैदानात येईल, अशी अनेकांना आशा होती. परंतू धोनीने इथेही धक्कातंत्र आजमावत जडेजा आणि सॅम कुरेनला आपल्या पुढे संधी देत नंतर येणे पसंत केले. कुरेन माघारी परतल्यानंतर धोनी मैदानात खेळण्यासाठी आला. तथापि एकही धाव न घेता विजयी फटका मारण्याची संधी डुप्लेसिसला दिली.
म्हणूनच सामना आटोपल्यानंतर माही का कमाल, लाजबाब धोनी, शानदार एमएसडी,’ अशा नानाविध प्रतिक्रिया उमटल्या. कोरोनाची भीती काही अंशी नाहिशी होण्यास धोनीने दिलेला आनंद कारणीभूत ठरला. सामन्यात अखेरच्या चेडूपर्यंत धोनीचा प्रभाव जाणवला. नाणेफेकीचा कौल बाजूने येताच त्याने चॅम्पियन मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
रोहित शर्मा , सूर्यकुमार यादव,हार्दिक पांड्या आणि कीरोन पोलार्ड या मॅच विनर्सना रोखणे केवळ धोनीलाच जमले.

मुंबईसाठी पहिला पराभव लकी ठरणार?
च् रोहितच्या संघाची सुरुवात पराभवाने झाली असली तरी गेल्या आठ वर्षात त्यांनी चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे पहिला पराभव मुंबईसाठी लकी ठरेल का, अशी चर्चा सुरू झाली आहे. आयपीएलच्या इतिहासात अनेक संघ सुरुवातीच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर जोरदार ‘कमबॅक’ करतात. मुंबई संघाने २०१२ साली पहिला सामना जिंकला होता.
च्काल पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली. मुंबईने सात वर्षापासून सुरू असलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती केली. २०१३ साली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने मुंबईचा पहिल्या सामन्यात पराभव केला होता. त्यानंतर २०१४ आणि २०१५ मध्ये केकेआरने, २०१६, २०१७ मध्ये पुणे संघाने, २०१८ मध्ये चेन्नई, २०१९ साली डेक्कन चार्जर्सने आणि आता चेन्नईने मुंबईचा पराभव केला.

Web Title: Dhoni truly becomes 'mastermind'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.