दुबई : ‘ यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा खूप वेगळी ठरणार असून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्पर्धेत महेंद्रसिंग धोनी विना खेळणार आहोत. त्यामुळे धोनीच्या अनुपस्थितीत फिनिशर म्हणून सर्व जबाबदारी माझ्या खांद्यावर असून माझ्या कारकिर्दीतील हे सर्वात मोठे आव्हान आहे,’ असे मत भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या याने व्यक्त केले.
एका मुलाखतीमध्ये हार्दिकने आपल्या आयुष्यातील आव्हाने आणि धोनीसोबत असलेल्या ताळमेळबाबत सांगितले. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी यंदा टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा मार्गदर्शक आहे. हार्दिकने म्हटले की, ‘ यंदाची विश्वचषक स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक ठरेल. खेळाडू म्हणून धोनी मैदानावर दिसणार नसल्याने सर्व जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. मी नेहमी असाच विचार करतो. कारण यामुळे माझ्यासमोरील आव्हान वाढते. यंदाची स्पर्धा रोमांचक होईल.’ धोनी विषयी हार्दिक म्हणाला की, ‘एमएस सुरुवातीपासून मला समजून घेतोय.
तर मी आज पेट्रोल पंपावर काम करत असतो - हार्दिक
मैदानावरील आणि मैदानाबाहेरील गोष्टींसाठी नेहमीच चर्चेत असलेल्या हार्दिक पांड्याने एका नव्या गोष्टीचा उलगडा केला आहे. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत पांड्याला प्रश्न विचारण्यात आला की, जास्त पैसा खेळाडूंच्या डोक्यात जातो का ? त्यावर तो म्हणाला, ‘पैसा कमावणे ही आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण पैसाच माणसाच्या आयुष्यात स्थिरता आणतो. आज जर मी पैसे कमावले नसते तर पेट्रोल पंपावर काम करण्याची वेळ माझ्यावर आली असती. तसंच क्रिकेटमध्ये जर पैसा नसता तर किती लोक क्रिकेट खेळतील याबाबत मी साशंक आहे. कारण पैशामुळे खेळाडूंनाही प्रेरणा मिळते’.
Web Title: In Dhonis absence all the responsibility is on my shoulders says hardik pandya
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.