Join us

धोनीचे पुनरागमन कठीणच, लोकेश राहुल ठरू शकतो योग्य पर्याय

गौतम गंभीर : यष्टिरक्षक-फलंदाज लोकेश राहुल ठरू शकतो योग्य पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 04:26 IST

Open in App

मुंबई : यंदा इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन न झाल्यास महेंद्रसिंग धोनीचे भारतीय संघात पुनरागमन कठीण होईल, असे मत माजी सलामीवीर गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे. धोनी भारताकडून मागच्या वर्षी जुलै महिन्यात विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये खेळत नसल्याने कपिल देव आणि सुनील गावसकर यांच्याारख्या दिग्गजांनी तर दीर्घकाळ खेळापासून अलिप्त असलेल्या झारखंडच्या या खेळाडूचे आंतरराष्टÑीय पुनरागमन कठीण असल्याचे मत आधीच व्यक्त केले आहे.

धोनीला यंदा आयपीएल खेळण्याची आशा होती, मात्र कोरोनामुळे आयपीएलच्या १३ च्या सत्राचे आयोजन कठीण होत आहे. स्टार स्पोटर््सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’कार्यक्रमात सोमवारी गंभीर म्हणाला, ‘यंदा आयपीएल न झाल्यास धोनीचे क्रिकेटमधील पुनरागमन कठीण असेल. मागच्या दीड वर्षापासून खेळत नसलेल्या धोनीची निवड तरी कुठल्या आधारे करणार.’ एकदिवसीय सामन्यात यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळणारा लोकेश राहुल हा धोनीचा चांगला पर्याय ठरू शकतो, असे मत गंभीरने व्यक्त केले.‘राहुलचे यष्टिरक्षण धोनीइतके चांगले नसेलही मात्र टी२० क्रिकेटचा विचार केल्यास राहुल उपयुक्त खेळाडू आहे. यष्टिरक्षणाशिवाय तो तिसऱ्या किंंवा चौथ्या स्थानावर फलंदाजीदेखील करु शकतो. आयपीएल होणार नसेल तर धोनीच्या पुनरागमनाचीही शक्यता संपुष्टात येते,’ असेगंभीरचे मत आहे. (वृत्तसंस्था)निवृत्ती ही धोनीची खासगी बाब‘तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व करीत असाल तर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणे गरजेचे आहे. जो संघाला विजयी करीत असेल त्याने संघात असायला हवे. निवृत्तीचा निर्णय हा धोनीचा खासगी विषय आहे.’-गौतम गंभीरधोनी आयपीएल खेळत राहील‘यंदाच्या आयपीएलमध्ये नाही तर या पुढील आयपीएलमध्ये धोनी खेळत राहील. सुनील जोशी यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती निवृत्तीबाबत धोनीसोबत चर्चा करेल. भविष्यातील योजनांबाबत धोनी स्वत: स्पष्ट आहे. २०१९ मध्ये इंग्लंडमधील विश्वचषकानंतर त्याने कर्णधार विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांच्याशीदेखील त्याने चर्चा केली असावी, असा मला विश्वास आहे. धोनी मात्र चेन्नई सुपरकिंग्सकडून आयपीएल खेळत राहील आणि चांगली कामगिरी करेल, असे माझे मत आहे.’-व्हीव्हीएस लक्ष्मण 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीगौतम गंभीर