आरसीबीविरुद्धची महेंद्रसिंग धोनीची खेळी टी-२० तील सर्वोत्कृष्ट खेळींपैकी एक होती. लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने स्वत:च्या शैलीत सामना संपविला. मला मात्र त्याची सुरुवात करण्याची वृत्ती प्रभावित करून गेली. पहिला चेंडू खेळण्यापासूनच त्याची देहबोली सकारात्मक होती. विनाअडथळा लक्ष्य गाठू, असाच विश्वास या खेळीत जाणवत होता.क्रिकेटप्रती धोनीच्या समर्पक वृत्तीचा मी मोठा चाहता आहे. तो एका मोहिमेवर निघालेला योद्धा वाटतो. त्याला रोखण्यासाठी प्रतिस्पर्धी संघांना अतिशय उच्च कोटीची कामगिरी करावी लागेल. अंबाती रायुडूचा सध्याचा फॉर्म जरी वगळला तरी चेन्नई सुपरकिंग्सपुढे मोठे लक्ष्य असते असे मुळीच वाटत नाही. कुठल्याही फॉर्ममध्ये सातत्यपूर्ण विजयासाठी मोठ्या भागीदारीची गरज असते. धोनी-रायुडू यांनी हेच काम केले. एखाद्या विशेष फलंदाजांसोबत खेळताना आपल्या खेळाचा दर्जा कधी उंचावला याची कल्पना देखील येत नाही. या दोन्ही फलंदाजांकडे पाहून असेच वाटते. दोघेही एकमेकांकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करून घेत आहेत.मोठ्या धावसंख्येचा बचाव करण्यात आरसीबीला पुन्हा एकदा अपयश आले. माझ्या मते उमेश यादवचे एक षटक अखेरपर्यंत वाचवून न ठेवण्यात विराटने चूक केली. वेगवान चेंडू आणि गोलंदाजीतील विविधतेमुळे यादवने अखेरच्या षटकात कमाल केली असती. चहलने देखील कमालीचा मारा केल्याने अखेरच्या षटकात कोहली त्याचा वापर करू शकला असता. पण अखेरचया टप्प्यात गोलंदाजी करताना चाचपडणाऱ्या गोलंदाजांवर विश्वास ठेवण्याशिवाय विराटपुढे कुठलाही पर्याय नव्हता.दिल्ली डेअरडेव्हिल्सचे नेतृत्व सोडण्याचा गौतम गंभीरचा निर्णय समजण्यासारखा आहे. संघासाठी हा निर्णय आगामी काही सामन्यात लाभदायी ठरू शकतो. दिल्लीला आता आठपैकी सात सामने जिंकावेच लागतील. पुढचा सामना कोलकाता नाईटरायडर्सविरुद्ध आहे. पुनरागमनासाठी धडपडणाºया संघाला केकेआरशी दोन हात करणे सोपे जाणार नाही. पण आयपीएलमध्ये कुठलाही सामना सोपा नसतो हे देखील आम्ही ध्यानात ठेवतो.श्रेयस अय्यर नव्या विचारांसह दिल्लीला विजयी वाटेवर परत आणेल, असा मला विश्वास वाटतो. दिल्ली संघाला युवा ताकदीची आणि दिशा देण्याची गरज आहे. स्पर्धेच्या मधल्या टप्प्यात बदल करीत या संघाने योग्य दिशेने पाऊल उचलले आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- पहिल्या चेंडूपासूनच धोनीची प्रभावी सकारात्मक वृत्ती
पहिल्या चेंडूपासूनच धोनीची प्रभावी सकारात्मक वृत्ती
माझ्या मते उमेश यादवचे एक षटक अखेरपर्यंत वाचवून न ठेवण्यात विराटने चूक केली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:03 AM