Join us  

धोनीचे गुरू म्हणतात..., असा ‘शिष्य’ मिळणे, हे भाग्यच!

तीन स्टम्पच्या मागे ज्या गुरूंनी उभं केलं ते के शव रंजन बॅनर्जी म्हणाले, असा शिष्य मिळण्यासाठी भाग्य लागते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 5:13 AM

Open in App

शाळेच्या फुटबॉल टीममध्ये गोलकिपिंग करणाऱ्याला तीन स्टम्पच्या मागे ज्या गुरूंनी उभं केलं ते केशव रंजन बॅनर्जी म्हणाले, असा शिष्य मिळण्यासाठी भाग्य लागते. धोनी इतरांपेक्षा वेगळा आहे. मी केवळ त्याला मार्ग दाखवला. त्या मार्गावर यश त्याने मिळवले आहे. येणाºया अनेक पिढ्या त्याच्याकडून प्रेरणा घेतील. रांची येथील जवाहर विद्या मंदिर शाळेत फुटबॉल संघात गोलकीपिंग करणाऱ्या लाजºयाबुजºया मुलाकडे अचानक क्रिकेट संघात यष्टिरक्षकाची भूमिका सोपविणारे केशव रंजन बॅनर्जी यांना विश्वास होता की, महेंद्रसिंग धोनी सर्वांत वेगळा आहे. या निर्णयाचा मला एक दिवस नक्की अभिमान राहील, असेही त्यांना वाटले होते. धोनीला क्रिकेटची धुळाक्षरे गिरवायला लावणारे त्याचे बालपणीचे प्रशिक्षक बॅनर्जी यांच्या निर्णयाचे क्रिकेट जगत सदैव ऋणी राहील. रांचीच्या त्या शाळेपासून भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार होण्यापर्यंतची सुवर्णमय वाटचालीला शनिवारी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यामुळे पूर्णविराम लागला.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनी