नवी दिल्ली: नुकताच पार पडलेल्या 2019 च्या वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये विकेट घेतल्यानंतर आपल्या खास शैलिने सॅल्यूट करणारा वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज सेल्डन कॉटरेल सर्वांना आठवत असेलच. याच कॉटरेलने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी टेरिटोरिअल आर्मीमधील पॅरॅशूट रेजीमेंटमध्ये दोन महिने देशासाठी सेवा बजावणार असल्याने त्याचे कौतुक केले आहे.
कॉटरेल म्हणला की, जो व्यक्ती क्रिकेटच्या मैदानावर प्रेरणा देतो. त्यासोबतच देशभक्त आणि कर्तव्य पलीकडे आपल्या देशाला अग्रस्थान देतो असे त्याने ट्विटर द्वारे म्हणटले आहे.
महेंद्रसिंग धोनी 31 जुलैपासून काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्यासोबत पहारा देणार आहे. सैन्य प्रशिक्षण घेण्यासाठी कॅप्टन कूल धोनी भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंटच्या बंगळुरू येथील मुख्यालयात बुधवारी दाखल झाला. भारतीय सैन्याची सेवा करता यावी यासाठी धोनीनं टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली आहे.
38 वर्षीय धोनी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असून, त्याच्याकडे लेफ्टनंट कर्नलपद आहे. 2011साली भारतीय लष्करानं त्याला हा मान दिला. 2015मध्ये त्यानं पॅराट्रुपरची परीक्षाही पास केली. पण, धोनी काश्मीर खोऱ्यात पहारा देणार असल्याने त्याच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित राहू शकतो.
त्यावर सैन्यदलाचे प्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले की,''धोनी सुरक्षा पुरवण्याची आवश्यकता नाही, तो देशवासियांची सुरक्षा करू शकतो. सैन्यात भरती होण्याचे जे स्वप्न पाहतात ते सर्व प्रसंगांना सामोरे जाण्याची धमक राखतात. धोनीनंही प्रशिक्षण घेतलं आहे आणि तो देशातील नागरिकांचे संरक्षण करू शकतो. धोनी आता धोनी हा 106 टेरिटॉरियर आर्मी बटालियनचा सदस्य ( पॅरा) आहे. त्यामुळे तो अनेकांचे रक्षण करू शकतो. त्यामुळे त्याला सुरक्षा पुरवण्याची गरज लागेल, असे मला वाटत नाही. तोच नागरिकांची सुरक्षा करू शकतो.'' असे त्यांनी स्पष्ट केले.