नवी दिल्ली : भारतीय वन डे संघात यष्टिरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी याचे स्थान अबाधित असून, त्याला पर्याय नसल्याचे मुख्य कोच रवी शास्त्री यांनी स्पष्ट केले. शास्त्री यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवीत सिनियर फलंदाज रोहित शर्मा यानेही धोनीचे स्थान सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.विराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या मालिकेत नेतृत्व करणारा रोहित धोनीच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह लावण्यात येत असल्याबद्दल आश्चर्यचकित झाला. रोहित म्हणाला,‘हा प्रश्न का उपस्थित केला जात आहे. मी तर कमालीचा हैराण झालो. धोनीची अलीकडील कामगिरी बघा. तो सातत्याने धावा काढत आहे. २०१९ च्या विश्वचषकात धोनी खेळणार की नाही, याबद्दल चर्चा करणे आणि प्रश्नचिन्ह लावणे योग्य नाही. असा विचार करणे म्हणजे एखाद्या खेळाडूचे मनोबल खच्ची करण्यासारखे आहे. ५० षटकांचा विश्वचषक अद्याप बराच दूर आहे. जे सध्या होणार आहे, त्याबाबत विचार केलेला बरा. धोनीचा फॉर्म चांगलाच असल्याने तो खेळत राहणार, इतकेच मी सांगू शकतो.आम्हाला आघाडीच्या फळीत फलंदाजी करण्याची जितकी संधी मिळते तितकी संधी धोनीला सामन्यात मिळत नाही. सहाव्या स्थानावर फलंदाजी करणाºया फलंदाजाला दडपणात खेळावे लागते. धावांची गती वाढविणे सरासरी कायम राखणे, प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि सामना जिंकून देणे इतक्या मोठ्या जबाबदाºया एकाच वेळी पूर्ण कराव्या लागतात, असे रोहितने धोनीबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात स्मरण करून दिले. (वृत्तसंस्था)>याआधी महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीवर अनेक माजी खेळाडूंनी शंका उपस्थित केली होती. मात्र धोनीने अनेकदा प्रतिकूल परिस्थीतीत निर्णायक भूमिका निभावताना भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. लंका मालिका संपल्यानंतर शास्त्री यांनी सध्या तरी वन डे संघात धोनीला पर्याय नसल्याचे स्पष्ट केले होते. धोनीच्या टीकाकारांना चोख उत्तर देत त्यांनी धोनीच्या चुका शोधण्याऐवजी वयाच्या ३६ व्या वर्षी करियरमधील अनेक यशस्वी टप्पे गाठणाºया माजी कर्णधाराच्या खेळाचे विश्लेषण करण्याचा शास्त्री यांनी विरोधकांना सल्ला दिला होता.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- एकदिवसीय संघात धोनीचे स्थान अबाधित - रोहित शर्मा
एकदिवसीय संघात धोनीचे स्थान अबाधित - रोहित शर्मा
नवी दिल्ली : भारतीय वन डे संघात यष्टिरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी याचे स्थान अबाधित असून, त्याला पर्याय नसल्याचे मुख्य कोच रवी शास्त्री यांनी स्पष्ट केले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:10 AM