मैदानाबाहेरही धोनीचा विक्रम, सर्वाधिक कर भरणा-यांमध्ये अव्वल

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटच्या मैदानाबाहेरही एक विक्रम केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 10:39 AM2018-07-24T10:39:43+5:302018-07-24T10:40:06+5:30

whatsapp join usJoin us
Dhoni's record also out of the field, top of most taxpayers | मैदानाबाहेरही धोनीचा विक्रम, सर्वाधिक कर भरणा-यांमध्ये अव्वल

मैदानाबाहेरही धोनीचा विक्रम, सर्वाधिक कर भरणा-यांमध्ये अव्वल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रांची - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटच्या मैदानाबाहेरही एक विक्रम केला आहे. सर्वाधिक टॅक्स (कर) भरण्याचा विक्रम त्याने केला आहे. धोनीने 2017-18 या आर्थिक वर्षांत 12.17 कोटी टॅक्स भरला आहे. बिहार आणि झारखंड राज्यांमध्ये सर्वाधिक कर भरणा-यांमध्ये धोनी अव्वल राहिला आहे. 
याआधी धोनीने 2016-17च्या आर्थिक वर्षात 10.93 कोटी टॅक्स भरला होता. 2013-14 मध्येही सर्वाधिक टॅक्स भरणा-यांमध्ये धोनी अव्वलस्थानी होता. फोर्ब्सच्या माहितीनुसार 2015 मध्ये धोनीची एकूण कमाई 765 कोटी रूपये होती.  2015 मध्ये धोनीने 217 कोटी कमवले होते. त्यात 24 कोटी हा त्याचा पगार होता आणि अन्य रक्कम ही जाहिरातीतून कमावली होती. 
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने 2018चे आयपीएल जेतेपद पटकावले आहे. क्रिकेट व्यतिरिक्त इंडियन सुपर लीग आणि हॉकी इंडिया लीगमधील संघात धोनी सहमालक आहे. याशिवाय त्याने 2017 मध्ये सेव्हन हा कपड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. त्याला रांचीत पंचतारांकित हॉटेल सुरू करायचे आहे आणि त्यासाठी त्याने राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे.  
 

Web Title: Dhoni's record also out of the field, top of most taxpayers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.