-अयाझ मेमन
संपादकीय सल्लागार
पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने आॅस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेला विजय खूप महत्त्वाचा आहे. कारण, सुरुवातीला मिळालेल्या विजयामुळे संघाला एक लय मिळते आणि मालिकेतील पुढील मार्ग थोडाफार सोपा होतो. माझ्या मते आॅस्ट्रेलियाचे प्रदर्शन खूप कमजोर होते. कारण, भारतासारख्या बलाढ्य संघाची प्रमुख फळी झटपट बाद करून त्यांचा अर्धा संघ शंभरीच्या आत गारद करूनही जर भारत २८१ धावा उभारतोय, तर कुठे ना कुठे त्यांच्यात कमतरता आहे. त्यात, कुल्टर नाइल आणि पॅट कमिन्सला वगळले, तर त्यांच्या गोलंदाजीमध्ये फार काही दम दिसत नाही. तरी मार्कस स्टोइनिसने दोन बळी घेतले. अॅडम झम्पासारख्या फिरकीपटूंना भारतीय फलंदाज देशांतर्गत सामन्यात अनेकदा खेळत असतात. त्यामुळेच आॅस्टेÑलियाची गोलंदाजी भारताला अडचणीत आणेल, असे दिसत नव्हते.
दुसरीकडे फलंदाजीतही ते अपयशी ठरले. पावसामुळे दुसºया डावाला टी-२० चे स्वरूप मिळाले. पण, तरी आॅस्टेÑलिया वाईटरीत्या अडकले. जसप्रीत बुमराहने खूप चांगली गोलंदाजी केली. हार्दिक पांड्या ‘मॅन विथ द गोल्डन आर्म’ ठरला, त्याने २ बळी घेतले. तसेच, कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल हे लेगस्पिनर भारी ठरले. मला वाटते, की ही जोडी संपूर्ण मालिकेत आॅस्टेÑलिया फलंदाजीला आपल्या तालावर नाचवेल.
भारताच्या स्टार खेळाडूंबाबत म्हणायचे झाल्यास, दोघांचीच चर्चा जास्त होईल. ते म्हणजे हार्दिक पांड्या आणि धोनी. पांड्या प्रत्येक सामन्यागणिक सुधारणा करीत आहे. त्याचा अनुभव सामन्यागणिक वाढत आहे. चेन्नईमध्ये त्याने खूप सफाईदार खेळ केला. मी कपिल देवनंतर पहिला असा फलंदाज बघितला, जो सफाईदारपणे उंच फटके मारत होता. शिवाय तो बेडर असून त्याला हवेत खेळणे आवडते आणि तो चांगल्या प्रकारे उंच फटके मारतो. महत्त्वाचे म्हणजे त्याने वेगवान खेळी केल्याने भारताची धावसंख्या अडीचशेच्या पार गेली. प्रशिक्षक शास्त्री त्याला याआधीच रॉकस्टार म्हणतात, पण माझ्या मते हा भविष्यातील भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार बनू शकतो.
आता राहिली गोष्ट धोनीची, त्याच्याविषयी जितके बोलू तितके कमी आहे. कारण त्याच्याविषयी खूप टीका झाली, प्रश्न निर्माण करण्यात आले. तो खेळण्याइतपत तंदुरुस्त आहे का, असे अनेक प्रश्न पुढे आले. पण, रविवारच्या प्रदर्शनानंतर धोनीने आपली पात्रता सिद्ध केली आहे. माझ्या मते भारतीय क्रिकेटमध्ये त्याची छबी ‘आयर्न मॅन’ अशी झाली आहे. त्याच्याकडे जबरदस्त अनुभव आहे, क्षमता आहे. महत्त्वाचे म्हणजे खेळाविषयी त्याचे विचार खूप चांगले आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघाला वर कसे काढावे, हे तो जाणून आहे व हीच खासियत आहे महेंद्रसिंह धोनीची.
Web Title: Dhoni's team India's 'Iron Man', India's victory against Australia, is important
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.