Join us  

Dhruv Jurel Story : कारगिल युद्धात लढणाऱ्या नेम सिंह यांचा मुलगा चमकला; ध्रुव जुरेलची राजस्थान रॉयल्ससाठी अविस्मरणीय खेळी

IPL 2023, Rajasthan Royals vs Punjab Kings Live : पंजाब किंग्सने १९७ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर राजस्थान रॉयल्ससाठी विषयच संपला होता...अशा परिस्थिती राजस्थानचे PBKS समोर उभे राहणेही अवघड होते, परंतु शिमरोन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांनी २६ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी केली अन् मॅचमध्ये रंगत आणली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 8:25 AM

Open in App

IPL 2023, Rajasthan Royals vs Punjab Kings Live : पंजाब किंग्सने १९७ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर राजस्थान रॉयल्ससाठी विषयच संपला होता... त्यात अर्शदीप सिंगने सुरुवातील धक्के दिले अन् नॅथन एलिसने ४ विकेट्स घेत RR चे कंबरडे मोडले होते... अशा परिस्थिती राजस्थानचे PBKS समोर उभे राहणेही अवघड होते, परंतु शिमरोन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांनी २६ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी केली अन् मॅचमध्ये रंगत आणली. अखेरच्या षटकात हेटमायर बाद झाला आणि इम्पॅक्ट खेळाडू म्हणूल आलेल्या ध्रुवच्या खांद्यावर सर्व जबाबदारी आली. त्याने अखेरच्या चेंडूपर्यंत प्रयत्न केला, परंतु ५ धावांनी RR चा विजय निसटला. राजस्थान रॉयल्सने २० लाखांत जुरेलला आपल्या ताफ्यात कायम घेतले आणि यष्टीरक्षक-फलंदाजाने त्याच्या किमतीपेक्षा सरस खेळ केला. 

IPL 2023, RR vs PBKS Live : पंजाब किंग्सचा रोमहर्षक विजय; हेटमायर, ध्रुव जुरेल यांचा अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष

कोण आहे ध्रुव जुरेल?आग्राच्या ध्रुव जुरेलला युवा आशिया चषक स्पर्धेतील अंडर-१९ क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय मालिकेत आग्राच्या खेळाडूला कर्णधारपदाची जबाबदारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. १ जानेवारी २००१ रोजी जन्मलेल्या ध्रुवचंद जुरेल याने आग्रा येथील स्प्रिंगल क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेटच्या बारकावे शिकले. मुसळधार पाऊस आणि वादळातही मैदानात सराव करण्याची त्याची आवड त्याला इथपर्यंत घेऊन आली आहे. कर्णधार बनल्याची माहिती मिळाल्यावर त्याने इंग्लंडमधून वडील नेमी चंद्र जुरेल यांना पहिला फोन केला होता आणि  फोनवर बोलताना ध्रुव खूप भावूक झाला होता.  

ध्रुवचे वडील नेम सिंह भारतीय सैन्यात होते आणि १९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान त्यांनीही पाकिस्तानला पराभूत करण्यात योगदान दिले होते. ध्रुवनेही सैनिक व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. आठवीत असताना ध्रुव चे नाते क्रिकेटशी जोडले गेले आणि त्याने मागे वळून नाही पाहिले. मग ध्रुवच्या वडीलांनीही आपल्या मुलाला क्रिकेटपटू बनण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला आणि त्याचे परिणाम समोर आहेत. 

ध्रुवने २१ चेंडूत शतक ठोकले- २०१८ मध्ये यूपीकडून कूच विहार ट्रॉफी खेळताना ११ सामन्यांमध्ये ७६२ धावा केल्या. यामध्ये तीन शतके झळकावली होती.  यष्टींमागे त्याने ५१ बळी टिपले होते. त्याच्या चमकदार कामगिरीने यूपी कूच विहारला ट्रॉफी जिंकून दिली.

- २०१४ मध्ये, अंडर-१७ शालेय राष्ट्रीय क्रिकेट चॅम्पियनशिप ट्वेंटी-२० मध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा किताब मिळवला. चॅम्पियनशिपमध्ये ध्रुवने सहा सामन्यांत चार शतके आणि दोन अर्धशतकांसह ६००हून अधिक धावा केल्या.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३राजस्थान रॉयल्सपंजाब किंग्सकारगिल विजय दिन
Open in App