Video: धुव्वा उडा के... धोनीचा हुक्का पिताना व्हिडिओ, चाहत्यांच्या भुवया उंचावल्या

धोनीच्या व्हायरल व्हिडिओत, माही आपल्या तोंडातून धूर काढताना दिसून येत आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 09:19 AM2024-01-07T09:19:51+5:302024-01-07T09:20:52+5:30

whatsapp join usJoin us
Dhuvva Uda Ke... MS Dhoni's hookah smoking video raises eyebrows among fans, social viral by MS dhoni party video | Video: धुव्वा उडा के... धोनीचा हुक्का पिताना व्हिडिओ, चाहत्यांच्या भुवया उंचावल्या

Video: धुव्वा उडा के... धोनीचा हुक्का पिताना व्हिडिओ, चाहत्यांच्या भुवया उंचावल्या

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

विश्वविजेत्या टीम इंडियाचा कर्णधार आणि भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी म्हणजे देशातील कोट्यवधी भारतीयांचा रोल मॉडेल. अतिशय कष्टातून आणि परिस्थितीशी दोन हात करत धोनीने स्वत:ला या उंचीवर नेऊन ठेवलंय. रेल्वेतील टीसीची नोकरी करणारा माही ते टीम इंडियाचा जगजेत्ता कर्णधार महेंद्रसिंह धोनी असा त्याचा प्रवास सर्वांनाच थक्क करणार आहे. त्यामुळे, धोनीचे जगभरात चाहते आहेत, त्याच्या लहान-सहान कृतीवरही ते आपली प्रतिक्रिया देतात. मात्र, चेन्नईचा थाला, एम.एस. धोनीचा एक व्हिडिओ समोर आला असून सर्वांनाच धक्का बसला आहे. 

धोनीच्या व्हायरल व्हिडिओत, माही आपल्या तोंडातून धूर काढताना दिसून येत आहे. एका पार्टीत धोनीने हुक्का पिल्याची चर्चा सोशल मीडियातून होत आहे. काळ्या रंगाचा सूट आणि लांब घनदाट केस या लूकमध्ये माही स्टायलिश दिसून येत आहे. व्हिडिओत धोनीच्या आजूबाजूला काही सुट-बुटातील लोकं आहेत. तर, त्याच्या हातात हुक्काचा पाईपही दिसून येतो. या पाईपचा एक कश घेऊन, धोनी तोंडातून धूर बाहेर सोडताना दिसत आहे. 

धोनीचा हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, काही चाहत्यांनी धोनीवर जबरी टीकाही केली. काहींना, अजूनही हा व्हिडिओ माहीचा नसल्याचे वाटते. तर, काहींनी धोनीच्या समर्थनार्थही भूमिका मांडली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा माजी कर्णधार जॉर्ज बेलीने याबाबतचा खुलासा केला होता. धोनी यंग प्लेअर्ससोबत चांगला बॉन्ड प्रस्थापित करण्यासाठी कधी-कधी हुक्का पितो, असे त्यांनी म्हटले होते. माहीला, कधी कधी थोडा हुक्का पिणे पसंत आहे. म्हणूनच तो त्याच्या रुममध्येच असतो. जॉर्ज आयपीएल २००९, २०१२ आणि २०१६ मध्ये धोनीसोबत क्रिकेट खेळला आहे. 

Web Title: Dhuvva Uda Ke... MS Dhoni's hookah smoking video raises eyebrows among fans, social viral by MS dhoni party video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.