Join us  

Krunal Pandya Match Fixing, IPL 2022: कृणाल पांड्याने फिक्सिंगचा नियम मोडला का? एका ट्वीटमुळे वादाला तोंड

दुखापतीमुळे कृणाल पांड्या होता संघाबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 9:13 PM

Open in App

Krunal Pandya Match Fixing, IPL 2022: प्ले-ऑफसाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात बुधवारी कोलकाताचा पराभव झाला. लखनौ सुपर जाएंट्स संघाने थरारक सामन्यात २ धावांनी विजय मिळवला आणि प्ले-ऑफमधील आपले स्थान पक्के केले. या सामन्यात लखनौ संघाने प्रथम फलंदाजी करताना बिनबाद २१० धावा कुटल्या. सलामीवीर क्विंटन डिकॉकने (Quinton De Kock) वादळी खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. डिकॉकने ७० चेंडूत नाबाद १४० धावा केल्या. त्यात १० चौकार आणि १० षटकार ठोकले. त्यामुळे क्विंटन डिकॉकच्या धमाकेदार खेळीची जोरदार चर्चा झालीच, पण त्याशिवाय लखनौचा अष्टपैलू कृणाल पांड्या एका विचित्र कारणामुळे चर्चेत आला.

लखनौच्या संघाचा स्टार खेळाडू कृणाल पांड्या केकेआरविरुद्धच्या मॅचमध्ये दुखापतीमुळे खेळू शकला नाही. पण तो डग आऊटमध्येच बसून टीमला चीअर करताना दिसला. डिकॉकने शतक पूर्ण केल्यानंतर कृणालने त्याचं अभिनंदन करणारं ट्वीट केलं. ते ट्वीटमुळेच काही प्रमाणात वाद निर्माण झाला. त्याने सामना सुरू असताना सव्वा नऊच्या आसपास ट्वीट केले. त्यामुळे कृणाल ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. सामन्याच्या ठिकाणी कोणालाही मोबाईल घेऊन बसण्यास परवानगी नसते, मग कृणालने ट्वीट करून मॅच फिक्सिंगबाबतचा नियम मोडला का? अशी चर्चा सोशल मीडियावर दिसून आली.

मॅच सुरू असताना कृणालने ट्वीट केल्यामुळे चाहत्यांनी यावर प्रश्न उपस्थित केले. मॅच सुरू असताना कृणाल फोनचा वापर कसा करू शकतो? असं एकाने विचारलं. तर, कृणालला दुखापतीमुळे संघात घेतलं नाहीये म्हणून त्याच्यासाठी नियम बदलण्यात आले का? असा सवाल दुसऱ्या एका युजरने केला.

टॅग्स :आयपीएल २०२२क्रुणाल पांड्यालखनौ सुपर जायंट्समॅच फिक्सिंग
Open in App