Join us  

टीम इंडियाला बऱ्याच वर्षांनी मिळाला मोठा ब्रेक; मग सुट्टी नाही! इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक

श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू 43 दिवसांच्या मोठ्या ब्रेकवर आहेत. मागील काही वर्षांपासून टीम इंडिया सातत्याने क्रिकेटच्या मैदानात ...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 12:53 PM

Open in App

श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू 43 दिवसांच्या मोठ्या ब्रेकवर आहेत. मागील काही वर्षांपासून टीम इंडिया सातत्याने क्रिकेटच्या मैदानात दिसली आहे. वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतर युवा खेळाडूचा प्रयोगही पाहायला मिळाले. पण यावेळी सर्वच खेळाडूंना बऱ्याच वर्षानंतर मोठी सुट्टी मिळाली आहे. कारण आता भारतीय संघ 19 सप्टेंबरलाच मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. पण त्यानंतर मात्र टीम इंडियाचे वेळापत्रक एकदम  खेळाडू एकदमच व्यग्र असणार आहेत. जाणून घेऊयात कसे असेल भारतीय संघाचे वेळापत्रक त्यासंदर्भातील सविस्तर माहिती 

१९ सप्टेंबर पासून घरच्या मैदानातून पुन्हा सुरु होईल मालिकांचा सिलसिला 

४३ दिवसांच्या मोठ्या सुट्टीनंतर बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेनं भारतीय संघ पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरल्याचे दिसेल. बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांसह तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरीसह भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची दावेदारी अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असेल. सध्याच्या घडीला भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत टॉपला आहे.  

भारत-बांगलादेश कसोटी मालिका

  • पहिला कसोटी सामना, भारत विरुद्ध बांगलादेश - चेन्नई (१९ ते २३ सप्टेंबर) 
  • दुसरा कसोटी सामना, भारत विरुद्ध बांगलादेश- कानपूर (२७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर) 

भारत बांगलादेश टी-20 मालिका

  • पहिला टी-२० सामना- भारत विरुद्ध बांगलादेश  धर्मशाला (६ ऑक्टोबर)
  • दुसरा टी-२० सामना - भारत विरुद्ध बांगलादेश  दिल्ली (९ ऑक्टोबर)
  • इंडिया वर्सेस बांग्लादेश तीसरा टी20- हैदराबाद ( १२ ऑक्टोबर)

बांगलादेशनंतर न्यूझीलंडचा पाहुणचार करणार टीम इंडिया

बांगलादेश विरुद्धची मालिका संपली की, फक्त चार दिवसांनी भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध खेळताना दिसेल. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात १६ ऑक्टोबर पासून होईल.  

  • पहिला कसोटी सामना- भारत विरुद्ध न्यूझीलंड, बंगळुरु (१६ ते २० ऑक्टोबर )
  • दुसरा कसोटी सामना- भारत विरुद्ध न्यूझीलंड- पुणे (२४ते २८ ऑक्टोबर)
  • तिसरा कसोटी सामना- भारत विरुद्ध न्यूझीलंड- मुंबई (१ ते ५ नोव्हेंबर)

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघ ४ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. ८ नोव्हेंबरला या दौऱ्यातील मालिकेची सुरुवात होणार असून १५ नोव्हेंबरला अखेरचा सामना खेळवण्यात येणार आहे. 

  • पहिला टी-२० सामना- दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, डरबन (८ नोव्हेंबर)
  • दुसरा टी-२० सामना- दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत , गकबेर्हा (१० नोव्हेंबर) 
  • तिसरा टी-२० सामना- दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, सेंच्युरियन (१३ नोव्हेंबर)
  • चौथा टी-२० सामना- दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, जोहान्सबर्ग (१५ नोव्हेंबर)

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर भारतीय संघ बॉर्डर गावसकर द्विपक्षीय कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल. यावेळी भारतीय संघ 4 ऐवजी 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मागच्या दोन दौऱ्यात भारतीय संघाने कांगारूंना पराभूत केले होते. यावेळी हॅटट्रिक नोंदवण्याच्या इराद्याने टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उत्सुक असेल. 

  • पहिला कसोटी सामना- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, पर्थ (२२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर)
  • दुसरा कसोटी सामना- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, अ‍ॅडिलेड (६ डिसेंबर ते १० डिसेंबर) 
  • तिसरा कसोटी सामना- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, ब्रिस्बेन (१४ डिसेंबर ते १८ डिसेंबर)
  • चौथा कसोटी सामना- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, मेलबर्न (२६ डिसेंबर ते ३० डिसेंबर)
  • पाचवा कसोटी सामना- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, सिडनी (३ जानेवारी ते ७ जानेवारी, २०२५)

जानेवारीमध्ये इंग्लडचा संघ करेल भारताचा दौरा 

ऑस्ट्रेलिया दौरा आटोपल्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध खेळताना दिसणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसह 3 सामन्यांची वनडे मालिका नियोजित आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टिने वनडे मालिका महत्वपूर्ण ठरेल. 

  • पहिला टी-20 सामना - भारत विरुद्ध इंग्लंड, चेन्नई (२२ जानेवारी,२०२५)
  • दुसरा टी-20 सामना - भारत विरुद्ध इंग्लंड, कोलकाता (२५ जानेवारी,२०२५)
  • तिसरा टी-20 सामना - भारत विरुद्ध इंग्लंड, राजकोट (२८ जानेवारी,२०२५)
  • चौथा टी-20 सामना - भारत विरुद्ध इंग्लंड, पुणे (३१ जानेवारी,२०२५)
  • पाचवा टी-20 सामना - भारत विरुद्ध इंग्लंड, मुंबई (०३ फेब्रुवारी,२०२५)

भारत-इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिका

  • पहिला टी-२० सामना - भारत विरुद्ध इंग्लंड, नागपूर (६ फेब्रुवारी,२०२५)
  • दुसरा टी-२० सामना - भारत विरुद्ध इंग्लंड, कटक (९ फेब्रुवारी,२०२५)
  • तिसरा टी-२० सामना - भारत विरुद्ध इंग्लंड, अहमदाबाद (१२ फेब्रुवारी,२०२५)