ICC Women's T20 World Cup, Semi-Final : भारत आणि इंग्लंड यांच्यातला उपांत्य फेरीचा सामना सुरू होण्यासाठी विलंब होत आहे. सिडनीत जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे हा सामना होण्याची शक्यताही फार कमीच आहे. त्यामुळे एकही चेंडू पडला नाही तरी टीम इंडियाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित होणार आहे. असे झाल्यास टीम इंडिया प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करेल. पण, टीम इंडियाचा अंतिम फेरीतील प्रवेश कसा पक्का होईल?
भारतीय संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये असला तरी रेकॉर्ड मात्र इंग्लंडच्या बाजूने आहे. टी२० विश्वचषकात आतापर्यंत दोन्ही संघांदरम्यान झालेले सर्व पाचही सामने इंग्लंडने जिंकले आहेत. वेस्ट इंडिजमधील मागच्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताचा आठ गडी राखून पराभव केला होता. त्याआधी २००९, २०१२, २०१४ आणि २०१६ ला देखील भारतावर मात केली होती. सध्याच्या संघातील ७ खेळाडू २०१८ च्या उपांत्य सामन्यात खेळल्या होत्या, त्यामुळे मागील पराभवाचा वचपा काढण्याची भारताकडे हीच संधी असेल. पण पावसामुळे ती हिरावण्याची शक्यता बळावली आहे.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एका संघानं किमात पाच षटकं खेळली तर तो सामना ग्राह्य धरला जातो. पण, या स्पर्धेत आयसीसीनं नियमात बदल केली असून एका संघाला किमान 10 षटकं खेळावी लागतील. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमाचा वापर केला जाईल. पावसामुळे 10 षटकंही न झाल्यास भारत आणि आफ्रिका अंतिम फेरीत जातील. उपांत्य पेरीच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे जर उपांत्य फेरीचे सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारत आणि दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत प्रवेश करतील. कारण, भारतानं अ गटात 8 गुणांसह, तर आफ्रिकेनं ब गटात 7 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.
मुंबई इंडियन्सच्या किरॉन पोलार्डचा ट्वेंटी-२० वर्ल्ड रेकॉर्ड!