मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा त्याच्या शांत स्वभावामुळे ओळखला जातो. परिस्थिती कितीही खडतर असली तरी धोनीने संयमीपणा खचू दिला नाही. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानावर उतरणार असला तरी त्याला धोनीचा खूप मोठा आधार असणार आहे. चतुर नेतृत्व, शांत डोकं आणि कोणत्याची परिस्थितीला धाडसाने सामोरे जाणाऱ्या धोनीला त्याचे मित्र मात्र 'दहशतवादी' या टोपण नावाने बोलवायचे.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2011मध्ये वन डे वर्ल्ड कप आणि 2007 मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. पण, शांत स्वभावाच्या धोनीला त्याचे मित्र दहशतवादी का म्हणतात. धोनीचा मित्र सत्य प्रकाशने Sporstarला सांगितले की,''धोनीला आम्ही आतंकवादी म्हणायचो. तो 20 चेंडूंत सहज 40-50 धावा चोपून जायचा, परंतु भारतीय संघाकडून खेळू लागल्यानंतर तो संत झाला. त्याच्या स्वभावातही बदल झाला.''
''धोनीनं क्वचितच सुरुवातीचा कर्णधारपद भूषविले असेल, परंतु आता पाहा तो जगातील सर्वोत्तम कर्णधारांच्या पंक्तीत बसला आहे. तो नेहमी हिंदीतच बोलायचा, परंतु आता तो धडाधड इंग्रजी बोलतो. त्याच्यातील क्षमता आम्ही ओळखू शकलो नाही,'' असे सत्य प्रकाशने सांगितले.
Web Title: Did you know MS Dhoni's friends jokingly called him a 'terrorist'?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.