२ एप्रिल २०११, ही तारीख भारतीय क्रिकेट चाहते कधीच विसरणार नाहीत... २८ वर्षांनंतर टीम इंडियानं वन डे वर्ल्ड कप जिंकला... सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याचं वर्ल्ड कप उंचावण्याचं स्वप्न संपूर्ण संघानं मिळून पूर्ण केलं होतं. कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) यानं मारलेल्या खणखणीत षटकारानंतर मुंबईचं वानखेडे स्टेडियम जल्लोषानं दणाणून निघालं होतं. त्या दिवसाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. कॅन्सरशी संघर्ष करत युवराज सिंगनं ( Yuvraj Singh) टीम इंडियाला हा ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. जेतेपदाची ट्रॉफी उंचावल्यानंतर खेळाडूंनी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला खांद्यावर उचलून स्टेडियमला मारलेली प्रदक्षिणा आजही आठवली की मन भावनिक होतं. IPL 2021, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीचे पाच भारी विक्रम, कर्णधार म्हणून अनोखे द्विशतक साजरे करण्याची संधी!
माहेला जयवर्धनेनं १०३ धावांची खेळी करताना श्रीलंकेला ६ बाद २७४ धावांचा पल्ला गाठून दिला. त्यानंतर लसिथ मलिंगानं टीम इंडियाला सुरुवातीला धक्के दिले. गौतम गंभीर ( Gautam Gambhir) खेळपट्टीवर नांगर रोवून उभा राहिला. त्यानं ९७ धावांची खेळी केली. मुथय्या मुरलीधरनचा सामना करण्यासाठी कर्णधार धोनीनं स्वतःला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला प्रमोशन दिलं अन् युवराज सिंगला मागे ठेवले. धोनीचा हा डाव यशस्वी ठरला. धोनीनं ७९ चेंडूंत नाबाद ९१ धावा चोपल्या. नुवान कुलसेकरानं टाकलेल्या ४९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचला अन् एकच जल्लोष झाला.क्विंटन डी कॉकनं पाकिस्तानी फलंदाजाचा 'पोपट' केला, मोठा वादच निर्माण झाला; Video
महेंद्रसिंग धोनीनं ज्या बॅटनं तो विजयी षटकार खेचला ती बॅट जगातील सर्वात महागडी बॅट आहे. ( MS Dhoni's 2011 World Cup final bat is the most expensive ever, check its worth here) वर्ल्ड कपच्या त्या बॅटीचं १८ जुलै २०११मध्ये लिलाव करण्यात आला आणि 'East Meets West' या लंडन येथे पार पडलेल्या चॅरिटीत ती बॅट विकली गेली आणि १६१,२९५ डॉलरमध्ये म्हणजेच जवळपास ७३.३ लाख रुपयांना R K Global Shares And Securities Ltd. कंपनीनं ती खरेदी केली. जगातीलल सर्वात महागडी बॅट म्हणून तिची Guinness World Records नोंद आहे. Fakhar Zaman : फखर जमानवर झाला अन्याय; भारतीय चाहते विसरले पाकिस्तानसोबतचे वैर अन्...