धोनीची ही स्टपिंग पाहिलीत का? तूम्हीही म्हणाल 'एक नंबर'

श्रीलंकेत सुरु असलेल्या पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने शिखर धवन आणि विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीच्या बळावर 9 विकेटनं सहज विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 11:30 PM2017-08-22T23:30:55+5:302017-08-23T13:02:49+5:30

whatsapp join usJoin us
Did you see Dhoni's stinging? You will also say a number | धोनीची ही स्टपिंग पाहिलीत का? तूम्हीही म्हणाल 'एक नंबर'

धोनीची ही स्टपिंग पाहिलीत का? तूम्हीही म्हणाल 'एक नंबर'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली, दि. 22 - श्रीलंकेत सुरु असलेल्या पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने शिखर धवन आणि विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीच्या बळावर 9 विकेटनं सहज विजय मिळवला. या सामन्यात धोनीनं लंकेच्या लसिथ मलिंगाला यष्टीचित केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.     

धोनीची बॅटींगमधील आक्रामकता भलेही कमी झाली असेल, मात्र स्टंप्सच्या मागे उभ्या राहत असलेल्या या विकेटकीपरकडे सध्या कुणीही बोट दाखवू शकत नाही. यजुवेंद्र चहलच्या एका बॉलवर धोनीने मलिंगाला असं काही आऊट केलं की, सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मलिंगाने पिचवर येताच चहलच्या बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चहलला आधीच अंदाज आला होता की, मलिंगा काय करणार आहे. त्यामुळे चहलने ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड बॉल टाकला. धोनीने या संधीचं सोनं केलं. मलिंगा जसाही समोर गेला धोनीने बेल्स उडवल्या. मलिंगाला परत येण्याची सुद्धा संधी धोनीने त्याला दिली नाही. 

भारताचा माजी कर्णधार आणि विकेटकिपर एम.एस धोनीची ही 98 वी स्टपिंग होती. 296 व्या सामन्याच धोनीनं 98 स्टपिंग केल्या आहेत. स्टपिंग करणाऱ्यामध्ये पहिल्या स्थानर लंकेचा महान विकेटकिपर कुमार संगकार आहे. त्यानं आतापर्यंत 99 स्टपिंग केल्या आहे. त्याचा रेकॉर्ड मोडण्यासाठी धोनीला दोन स्टपिंगची गरज आहे. या मालिकेत धोनी संगकाराचा हा रेकॉर्ड मोडत सर्वाधिक स्टपिंग करण्याचा विक्रम आपल्या नावावर करु शकतो. 

पहा व्हिडिओ...


पहिल्या सामन्यातील नंबर गेम -
७१ चेंडूंत शतक पूर्ण करीत शिखर धवनने कारकिर्दीतील सर्वात वेगवान ‘सेन्चुरी’ ठोकली. यापूर्वी, कानपूर येथे २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ७३ चेंडूंत त्याने शतक फटकावले होते. त्याची नाबाद १३२ धावा ही दुसरी सर्वाेच्च धावसंख्या आहे. द. आफ्रिकेविरुद्ध २०१५ मध्ये विश्वचषकात त्याने १३७ धावा केल्या होत्या.

१२७ चेंडू शिल्लक ठेवत भारताने सामना जिंकला. २०० आणि त्यापेक्षा अधिक धावसंख्या असताना मिळवलेला हा चौथा विजय आहे. यापूर्वी २०१४ मध्ये एजबॅस्टन येथे ११७ चेंडू शिल्लक ठेवत इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला होता.

७७ धावांसाठी श्रीलंकेने त्यांचे ९ गडी गमावले. २५ व्या षटकात त्यांची स्थिती १ बाद १३९ अशी होती. अशीच स्थिती दोन वेळा झाली होती. भारताविरुद्धच त्यांची ही सर्वात दयनीय स्थिती होती.

१६ धावांसाठी श्रीलंकेने सहा फलंदाज गमावले. भारताविरुद्ध हीसुद्धा सर्वात वाईट कामगिरी राहिली. श्रीलंकेचे फलंदाज १, २, ०, ५, ८, ० अशा धावांवर बाद झाले.

१९७ धावांची भागीदारी धवन आणि कोहली यांनी केली. ही दुसºया गड्यासाठी केलेली श्रीलंकेतील सर्वाेत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी महेंद्रसिंह धोनी आणि गौतम गंभीर यांनी २००९ मध्ये १८८ धावांची भागीदारी केली होती.
 

Web Title: Did you see Dhoni's stinging? You will also say a number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.