"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील मुंबई इंडियन्सचे आव्हान कालच्या आठव्या पराभवाने संपुष्टात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 04:49 PM2024-05-04T16:49:07+5:302024-05-04T16:49:26+5:30

whatsapp join usJoin us
"Didn't See Respect For Hardik Pandya, MI's Story Over": Irfan Pathan, who has been critical of Hardik Pandya since the start of the season, once again questioned the tactics of the MI captain | "हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई

"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील मुंबई इंडियन्सचे आव्हान कालच्या आठव्या पराभवाने संपुष्टात आले आहे. ११ सामन्यांत मुंबईला फक्त ३ विजय मिळवता आले आहेत आणि उर्वरित ३ सामने जिंकून ते १२ गुणांपर्यंत पोहोचू शकतील, जे प्ले ऑफसाठी पुरेसे नाहीत. जेव्हापासून हार्दिक पंड्या आयपीएल २०२४ हंगामात मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून मैदानात उतरला,  तेव्हापासून हे हंगाम त्याच्यासाठी व टीमसाठी काहीही खास गेलेले नाही. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या कालच्या पराभवानंतर माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने ( Irfan Pathan) पांड्याची बिनपाण्याने धुलाई केली.  

रितिका सजदेहची रिॲक्शनच सारं काही सांगून गेली! ती विकेट MI ची वाट लावून गेली, Video 


शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा २४ धावांनी पराभव केला. विजयासाठी १७० धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संघ १८.५ षटकांत सर्वबाद १४५  धावांवर आटोपला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ५६ धावांचे योगदान दिले. केकेआरकडून मिचेल स्टार्कने चार तर वरुण चक्रवर्ती, सुनील नरीन आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.  पराभव झाल्यानंतर इरफान पठाणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यात इरफान पठाण म्हणाला, मुंबई इंडियन्सची प्रवास इथेच संपला आणि त्यांचा संघ कागदावर खूप मजबूत दिसत होता. मात्र त्याचे योग्य व्यवस्थापन  झाले नाही. हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर उपस्थित केलेले प्रश्न योग्य आहेत. जेव्हा KKRने ५७ धावांवर ५ विकेट्स गमावल्या होत्या. तेव्हा जसप्रीत बुमराहला आणायला हवं होतं. मनीष पांडे आणि व्यंकटेश अय्यर यांनी नमन  धीरला सलग तीन षटके मिळाल्याचा फायदा घेतला.  


इरफान पुढे म्हणाला, एकेकाळी तुम्ही KKR ला १५० च्या आधी रोखू शकला असता, पण त्यांना १७० धावांपर्यंत जाऊ दिले. ही गोष्ट सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली. क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यात कर्णधारपद आणि व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते. माझ्या मते मुंबई संघ सध्या एकसंध खेळत नाही. हार्दिकला कर्णधार म्हणून स्वीकारणे मुंबईच्या खेळाडूंना अद्याप जमलेले नाही, असे दिसते

Web Title: "Didn't See Respect For Hardik Pandya, MI's Story Over": Irfan Pathan, who has been critical of Hardik Pandya since the start of the season, once again questioned the tactics of the MI captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.