Join us  

'ती' मिळाली नाही; मग धवननं क्रिकेटचा नादच सोडला! गब्बरनं शेअर केली निवृत्तीमागची गोष्ट

आता 'ती' कोण? या प्रश्नाच उत्तर शिखर धवननं अगदी मनमोकळेपणानं व्यक्त केलेल्या भावनेत दडलं आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 12:44 PM

Open in App

Shikhar Dhawan On His Retirement Announcement : भारताचा माजी क्रिकेटर शिखर धवन याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधील निवृत्तीच्या आपल्या निर्णयावर पहिल्यांदाच मनातली गोष्ट बोलून दाखवलीये. ऑगस्टमध्ये वयाच्या ३८ व्या वर्षी गब्बरनं निवृत्तीची घोषणा केली. आता तो लीजेंड्स लीग क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेट एन्जॉय करत आहे. कदाचित 'ती' मिळाली असती तर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नाद सोडला नसता, असेच त्याच्या वक्तव्यावरून वाटते. आता 'ती' कोण? या प्रश्नाच उत्तर शिखर धवननं अगदी मनमोकळेपणानं व्यक्त केलेल्या भावनेत दडलं आहे. 

'ती' मिळाली नाही, अन् गब्बरनं क्रिकेटचा नादच सोडला

लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत खेळत असलेल्या शिखर धवन याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये निवृत्तीचा निर्णय घेण्याची वेळ का आली? यासंदर्भातील भावना अगदी मनापासून व्यक्त केली. तो म्हणाला की, मला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची तयार नव्हतो. १८-१९ व्या वर्षी क्रिकेटच्या ज्या प्रकारात खेळतो त्याकडे पुन्हा वळण्यासाठी मनापासून जी प्रेरणा गरजेची होती 'ती'  मिळाली नाही." त्याने उल्लेख केला नसला तरी 'ती' म्हणजे त्याला न मिळाली संधी हा देखील त्याच्या निवृत्तीमागचं एक कारण आहे. 

दोन वर्षांत  फारच कमी आंतरराष्ट्रीय सामने खेळला गब्बर

दोन वर्षांत फार आंतरराष्ट्रीय सामने खेळायला मिळाले नाही. मी फक्त आयपीएलच खेळत होतो. असेही तो म्हणाला. टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी कोणत्याही क्रिकेटला देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करणे गरजेचे असते. पण मागे वळून पुन्हा देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची 'ती' प्रेरणाच तो हरवून बसला होता. एवढेच नाही सातत्यपूर्ण क्रिकेट खेळण्याचा अभाव  या सर्व गोष्टींचा विचार करूनच त्याने शेवटी थांबण्याचा निर्णय घेतला, हेच त्याच्या बोलण्यातू स्पष्ट होते.  

शिखर धवनची कारकिर्द

२०१३ ते २०२२ या कालावधीत शिखर धवन याने भारताकडून ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय आणि ६८ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.  २०२१ मध्ये श्रीलंके विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तो टीम इंडियाचे नेतृत्व करतानाही दिसला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडियानं त्याच्या कॅप्टन्सी  १२  पैकी  ७ सामन्यात विजय मिळवला.  ३ सामन्यात संघाच्या पदरी पराभव आला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी ही तो वनडे वर्ल्ड कप संघाचा भाग असल्याचे संकेत देणारी होती. पण त्यानंतर जे घडलं ते अगदी वेगळं होतं. शुबमन गिलनं त्याची जागेवर कब्जा केला अन् धवन संघाबाहेर पडला तो पडलाच. 

 

टॅग्स :शिखर धवनभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय