Join us  

सलग तिसऱ्यांदा आयपीएलबाहेर राहण्याचा निर्णय कठीण : ज्यो रुट

राष्ट्रीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे इंग्लंडचा कसोटी कर्णधार ज्यो रुट याने सलग तिसऱ्यांदा आयपीएलपासून स्वत:ला दूर ठेवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 5:25 AM

Open in App

चेन्नई : राष्ट्रीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे इंग्लंडचा कसोटी कर्णधार ज्यो रुट याने सलग तिसऱ्यांदा आयपीएलपासून स्वत:ला दूर ठेवले आहे. आयपीएलच्या १४व्या पर्वासाठी १८ फेब्रुवारी रोजी येथे लिलाव होणार असून, २९२ खेळाडूंवर बोली लावली जाईल. यात रुटचे सहकारी मोईन अली, जेसन रॉय आणि मार्कवूड यांचा समावेश आहे. रूट म्हणाला, हा निर्णय कठीण आहे. मी आयपीएलमध्ये सहभागी होण्यास आणि कायम राहण्यास उत्सुक आहे.’  इंग्लंड संघाचे यंदा व्यस्त वेळापत्रक आहे. घरच्या मैदानावर त्यांना न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यानंतर ऑगस्टपासून भारताविरुद्ध पाच कसोटी सामने खेळावे लागणार असून, पाठोपाठ ॲशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करावा लागणार आहे.  ‘यंदा आम्हाला मोठ्या संख्येने कसोटी सामने खेळायचे असल्याने आयपीएल खेळल्याने इंग्लंडला लाभ होईल, असे वाटत नाही. पुढच्यावर्षी आयपीएल खेळण्याचा आणि किमान लिलावात सहभागी होण्याचा मी प्रयत्न करेन,’ पहिली कसोटी जिंकल्यानंतरही दुसऱ्या सामन्यात कोणकोणत्या परिस्थितीवर मात करावी लागेल, याची संघाला जाणीव आहे.- ज्यो रुट

टॅग्स :आयपीएलजो रूट