Join us  

दिलीप वेंगसरकर यांना हटविण्याचा विचार नाही, प्रकल्प संचालकाचा शोध सुरू

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे सदस्य असलेले माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा कुठलाही विचार नसल्याचे शनिवारी भारतीय क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 3:40 AM

Open in App

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे सदस्य असलेले माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा कुठलाही विचार नसल्याचे शनिवारी भारतीय क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले. त्यांच्या भविष्याचा निर्णय बीसीसीआयच्या पुढील आमसभेत होईल. याशिवाय पूर्णकालीन प्रकल्प संचालकाचा शोध घेण्यात येत आहे.वेंगसरकर यांच्या भविष्याबाबत विचारताच बीसीसीआयच्या एका पदाधिकाºयाने सांगितले, की वेंगसरकर यांचा बीसीसीआयसोबत कुठलाही करार नाही. त्यामुळे त्यांंना पदावरून काढण्याचादेखील प्रश्न नाही. ते समितीचे अनियमित सदस्य आहेत. प्रत्येक उपसमितीप्रमाणे त्यांचाही कार्यकाळ आमसभेत निश्चित होईल. बीसीसीआय लवकरच एनसीएसाठी पूर्णकालिन प्रकल्प संचालक नियुक्त करणार आहे. एनसीएच्या विकासाच्या अनेक योजना तयार आहेत. त्यासाठी आम्हाला एक प्रकल्प संचालक नेमायचा आहे. संचालक हा एनसीएत बदल घडवून आणण्यास ब्ल्यूप्रिनट तयार करण्यासाठी बीसीसीआयला सहकार्य करणार आहे. काही नवीन माहिती असेल तर ती देखील अमंलात आणू. याशिवाय स्थानिक क्रिकेटपटूंना मिळणा-या मानधनाचे स्वरुप बदलण्याचा ुविचार आहे पण अंतिम निर्णय अद्याप व्हायचा असल्याचे या अधिकाºयाने सांगितले.(वृत्तसंस्था)

टॅग्स :बीसीसीआय