भारताचा माजी विकेट किपर बॅटर दिनेश कार्तिक याने नुकतीच आपल्या मनातील ऑल टाइम इंडिया इलेव्हन निवडली होती. आपल्या या संघात त्याने टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीला मात्र स्थान दिले नव्हते. ही गोष्ट क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित करून सोडणारी होती. यावर आता दिनेश कार्तिकनं प्रतिक्रिया दिली आहे. धोनीला संघात स्थान न देणं ही माझी मोठी चूक आहे, असे तो म्हणाला आहे.
विकेट किपर असून ही निवड करताना चुकला
दिनेश कार्तिकनं टीम इंडियाची ऑल टाइम इलेव्हन निवडली होती. त्यात त्याने राहुल द्रविडचा समावेश केल्याचेही दिसून येते. धोनीला वगळून त्याने पार्ट टाईम विकेट किपरला पसंती दिल्याचा अंदाजही अनेकांनी लावला. पण त्यात तथ्य नाही. कारण एक विकेट किपर असून ही प्लेइंग इलेव्हनमधील ही जागा निवडायला मी विसरलो, असेही कार्तिकनं कबुल केले आहे.
"माफ करा भावांनो मोठी चूक झाली"
कार्तिकनं क्रिकबझवरील वापरकर्त्यांशी गप्पा गोष्टी करताना दिनेश कार्तिकनं आपली चूक मान्य केली. तो म्हणाला की, भावांनो खरंच माझ्याकडून मोठी चूक झाली. मला माफ करा. प्लेइंग इलेव्हन निवडताना डोक्यात खूप वेगवेगळ्या गोष्टी सुरु होत्या. मी विकेट किपरच्या रुपात धोनीला विसरला. द्रविड प्लेइंग इलेव्हनचा हिस्सा असल्यामुळे अनेकांना ही निवड मी पार्ट टाइम विकेट किपरच्या रुपात केलीये असे वाटले. पण तसं नाही. द्रविडची निवड ही त्या दृष्टीने केली नव्हती. धोनी हा माझ्या प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. एवढेच नाही तो माझ्या टीमचा कॅप्टनही आहे, असे कार्तिकनं म्हटलं आहे.
धोनी महान क्रिकेटरपैकी एक, तोच DK च्या प्लेइंग इलेव्हनचा कॅप्टन
कदाचित तुम्हाला पटणार नाही. पण एक विकेट किपर असून मी प्लेइंग इलेव्हनमध्ये विकेट किपर निवडायला विसरलो. ही एक मोठी चूक होती. माझ्यासाठी ही गोष्ट एकदम स्पष्ट आहे. थाला धोनी क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात ही जागा भरून काढण्यास परफेक्ट आहे. महेंद्रसिंह धोनी हा फक्त भारतीय संघातीलच नाही तर क्रिकेट जगतातील महान खेळाडू आहे, असेही कार्तिक म्हणाला आहे. आपल्या टीममध्ये बदल करत त्याने धोनीला ७ व्या क्रमांकावर पसंती देत माहिकडेच या संघाची कॅप्टनीस असेल, असेही म्हटले आहे.