मुंबई : भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक आता चांगालाच संकटात अडकू शकतो. कारण बीसीसीआयने कार्तिकला एक नोटीस पाठवली आहे आणि या नोटीशीला त्याला लवकरच उत्तर द्यावे लागणार आहे. कार्तिकने उत्तर दिले नाही तर त्याची कारकिर्द धोक्यात येऊ शकते.
कार्तिक हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार आहे. बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना करारबद्ध केले आहे. या करारामध्ये काही नियम आणि अटी आहेत. त्या नियमांचे आणि अटींचे पालन खेळाडूंना करावे लागते, जर पालन झाले नाही तर बीसीसीआय त्यांच्यावर कडक कारवाई करते.
बीसीसीआयने कार्तिकला एक नोटीस पाठवली आहे. या नोटीशीला उत्तर देण्यासाठी कार्तिकला सात दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. जर कार्तिककडून चूक घडली असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. पण त्यासाठी कार्तिकने नोटीशीला उत्तर देणे गरजेचे आहे. जर कार्तिकने या नोटीशीला उत्तर दिले नाही तर त्याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय बीसीसीआय घेऊ शकते.
सध्या कॅरेबियन प्रीमिअर लीग सुरु आहे. या लीगमध्ये ट्रिनबागो नाइट राइडर्स या संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये कार्तिकला पाहिले गेले. बीसीसीआयच्या नियमांनुसार जर खेळाडूला अन्य देशातील ड्रेसिंग रुममध्ये जायचे असेल तर त्यासाठी बीसीसीआयची परवानगी घेणे गरजेचे असते. कार्तिकने ट्रिनबागो नाइट राइडर्सच्या ड्रेसिंग रुममध्ये जाण्याची परवानगी बीसीसीआयकडून घेतली नव्हती. त्यामुळे कार्तिकला बीसीसीआयने नोटीस बजावली आहे.
या सामन्याच्या वेळी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक आणि अभिनेता शाहरुख खानही उपस्थित होता. पाहा व्हिडीओ...