Join us  

भारतीय कसोटी संघात दिनेश कार्तिकला संधी

आयपीएलमध्ये खेळताना साहाला हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला आयीएलच्या काही सामन्यांही मुकावे लागले होते. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी साहाची तंदुरुस्ती चाचणी घेण्यात आली. या चाचणीत तो तंदुरुस्त ठरू शकला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2018 3:24 PM

Open in App
ठळक मुद्देभारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात वृद्धिमान साहाऐवजी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे.

मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात वृद्धिमान साहाऐवजी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. हा सामना 14 जूनला बंगळुरु येथे खेळवण्यात येणार आहे. 

आयपीएलमध्ये खेळताना साहाला हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला आयीएलच्या काही सामन्यांही मुकावे लागले होते. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी साहाची तंदुरुस्ती चाचणी घेण्यात आली. या चाचणीत तो तंदुरुस्त ठरू शकला नाही. त्यामुळेच साहाऐवजी कार्तिकला संधी देण्यात आली आहे.

बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी शनिवारी एर पत्रक जाहीर केले. या पत्रकामध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात साहाऐवजी कार्तिकला संधी देण्यात आली आली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत असताना साहाला दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळेच साहाला आयपीएलच्या अंतिम फेरीतही खेळता आले नव्हते. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने साहाच्या दुखापतीची चाचणी केली. त्यानुसार साहाला जवळपास पाच आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे. आगामी इंग्लंडचा दौरा पाहता साहाला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :दिनेश कार्तिकवृद्धिमान साहा