नवी दिल्ली : मराठमोळा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफीच्या 2022च्या हंगामात शानदार कामगिरी करून भारतीय संघाचा दरवाजा ठोठावला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ऋतुराजने महाराष्ट्राकडून खेळताना उत्तर प्रदेश विरूद्ध दुहेरी शतक ठोकले होते. यातील एका षटकात त्याने तब्बल 7 षटकार ठोकून विश्वविक्रम केला. त्यामुळे ऋतुराज गायकवाडवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच आता भारतीय संघाचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने ऋतुराजचे कौतुक करताना एक सूचक विधान केले आहे.
दरम्यान, एका षटकात 7 षटकार खेचून विक्रमी कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीत सलग दुसऱ्या शतकाची नोंद केली. हे शतक आसामविरूद्धच्या सामन्यात आले होते. विजय हजारे ट्रॉफी 2022मध्ये ऋतुराजने 9 इनिंग्जमध्ये 6 शतकं व 1 द्विशतक झळकावले आहे. मागील चार सामन्यांत ऋतुराजने 124* ( वि. रेल्वे), 40 ( वि. बंगाल), 220* ( वि. उत्तर प्रदेश) आणि 101* ( वि. आसाम) अशी कामगिरी केली आहे. उत्तर प्रदेशनंतर त्याने आसामच्या गोलंदाजांचा देखील समाचार घेतला होता.
कार्तिकने केला कौतुकाचा वर्षावदिनेश कार्तिकने ट्विट करून एक मोठे विधान केले आहे. "देवा, हा माणूस देशांतर्गत क्रिकेट खूप सोपे बनवत आहे, काय खेळाडू आहे. @Ruutu1331 सर्व नॉकआउट गेममध्ये तू शानदार खेळी केलीस. लवकरच पुन्हा आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन होईल", अशा आशयाचे ट्विट करून कार्तिकने सूचक विधान केले आहे.
ऋतुराज गायकवाडची विजय हजारे ट्रॉफीतील कामगिरी136(112)154*(143)124(129)21(18)168(132)124*(123)40(42)220*(159) उपांत्य पूर्वी फेरी विरूद्ध उत्तर प्रदेश 168(126) उपांत्य फेरी विरूद्ध आसाम
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"