ऑस्ट्रेलिया टीम बॅगमध्ये भरुन आणतेय 'ही' गोष्ट; भारतीय क्रिकेटर म्हणाला, 'आमच्या देशातही मिळेल ही वस्तु'

न्यूझीलंड विरुद्धची मालिका संपल्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी खेळणार आहे.  9 फेब्रुवारीपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 04:10 PM2023-01-30T16:10:15+5:302023-01-30T16:13:27+5:30

whatsapp join usJoin us
dinesh karthik on marnus labuschagne coffee tweet australia | ऑस्ट्रेलिया टीम बॅगमध्ये भरुन आणतेय 'ही' गोष्ट; भारतीय क्रिकेटर म्हणाला, 'आमच्या देशातही मिळेल ही वस्तु'

ऑस्ट्रेलिया टीम बॅगमध्ये भरुन आणतेय 'ही' गोष्ट; भारतीय क्रिकेटर म्हणाला, 'आमच्या देशातही मिळेल ही वस्तु'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

न्यूझीलंड विरुद्धची मालिका संपल्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी खेळणार आहे.  9 फेब्रुवारीपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होत आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची तयारी सुरू आहे. ऑस्ट्रलिया संघानेही भारतात येण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेटरची एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टला भारतीय क्रिकेटर दिनेश कार्तिकने कमेंट केली आहे.  

ऑस्ट्रेलियाचा स्टार प्लेअर मार्नस लाबुशेन भारतासाठी धोका असू शकतो. ऑस्ट्रेलियाचा हा खेळाडू सद्या फॉर्ममध्ये आहे. गेल्या कसोटी सामन्यात जोरदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियन टीमला या प्लेअरकडून अपेक्षा आहेत. मार्नस लाबुशेनेही कसोटीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन नुकतेच एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत एका बॅगेत अनेक कॉफीच्या बॅग्स दिसत आहेत. या पोस्टच्या कॅप्सनमध्ये त्याने, भारतासाठी काही किले कॉफी. तुम्ही सांगू शकता याचे वजन किती असेल?, असं म्हटले आहे. 

या पोस्टला भारतीय क्रिकेटर दिनेश कार्तिकने कमेंट केली आहे. 'मित्रा तुम्हाला भारतातही चांगली कॉफी मिळेल', अशी कमेंट दिनेशने केली आहे. 

Murali Vijay: वीरूसारखा मला पाठिंबा मिळाला नाही! टीम इंडियावर आरोप करणाऱ्या मुरली विजयची निवृत्तीची घोषणा
  
ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकणे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण टीम इंडियाने ही मालिका जिंकली तर टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचेल. रोहित शर्मा आणि टीम सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहेत.

 बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 चे वेळापत्रक

विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर येथे पहिली कसोटी - ९-१३ फेब्रुवारी

अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे दुसरी कसोटी - १७-२१ फेब्रुवारी

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला येथे तिसरी कसोटी - १-५ मार्च

नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे चौथी कसोटी - 9-13 मार्च

Web Title: dinesh karthik on marnus labuschagne coffee tweet australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.