टीम इंडियाचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिक ३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर टीम इंडियात परतला. आणि तेव्हापासून तो जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. कार्तिकने मॅच फिनिशरची भूमिका बजावत अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिला. ही कामगिरी पाहून त्याची २०२२ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली.
टीम इंडियाला (Team India) उद्या २३ ऑक्टोबरला टी-20 विश्वचषक २०२२ चा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. टीम इंडियाचे खेळाडू या सामन्यापूर्वी नेट सराव करत आहेत. यापार्श्वभूमिवर दिनेश कार्तिकची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्याने कर्णधार रोहित शर्माबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.
दिनेश कार्तिकने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, यात तो टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे कौतुक करत आहे आणि त्याला त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणत आहे. कार्तिकच्या या पोस्टला अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कार्तिकने रोहितचे कौतुक केले आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय रोहितला दिले आहे. “ज्याने सर्व काही केले, माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्यासाठी नेहमीच वेळ काढला आणि कठीण काळात मला साथ दिली अशा व्यक्तीसाठी ही पोस्ट, मी सदैव ऋणी आहे. तो माझ्यासाठी रोहित शर्मा आहे, असं पोस्टमध्ये कार्तिकने म्हटले आहे.
तसेच कार्तिकने रिकी पाँटिंगला त्याचा आवडता क्रिकेटर म्हटले, सहज माझ्या आवडत्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे आणि मुंबई इंडियन्स दरम्यान मी त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक मिनिट तुम्हाला खूप मिस करतो. तो एक चॅम्पियन लीडर आहे आणि गेममध्ये एक मोठा स्पर्धक आहे आणि मला त्याच्याबद्दल खूप आवडते. मला आशा आहे की भविष्यातही मला त्याच्यासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, असं कार्तिकने रिकी पॉन्टींगबद्दल लिहिले आहे.
दिनेश कार्तिक आणि रोहित शर्मा यांच्यातील बॉन्डिंग अनेकदा मैदानात आपल्याला पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहितने दिनेशची मान पकडली, यावर अनेक नेटकऱ्यांनी मीम्स बनवले होते.
तर दुसऱ्या टी-20 सामन्यात रोहित आणि कार्तिकने सामना फिनीश करुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता, या सामन्यानंतर मैदानातच दोघांनी एकमेकांना मिठी मारली, तर तिसऱ्या मॅटमध्ये रोहित कार्तिकच्या हेल्मेटला किस करताना दिसला होता.