Join us  

Dinesh Karthik Viral Video: धूर आणि जाळ संगटच! 'रोल नं. १' दिनेश कार्तिकची विमानातली स्टाईल पाहिलीत का?

दिनेश कार्तिकला तीन वर्षांनी भारताच्या संघात मिळालंय स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 7:06 PM

Open in App

Dinesh Karthik Viral Video: भारताचा अनुभवी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याचे प्रदीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. २०१९ च्या वनडे विश्वचषक स्पर्धेनंतर दिनेश कार्तिकला थेट २०२२ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत संधी मिळाली. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने सलग दोन पराभवानंतर तिसरा सामना जिंकला. IPL मध्ये फिनिशरची भूमिका पार पाडणारा टीम इंडियाचा नवा फिनिशर दिनेश कार्तिकचे राजकोटला जाताना विमानात खास स्वागत करण्यात आले. या स्वागताचा व्हिडिओ दिनेश कार्तिकने त्याच्या ट्विटरवर शेअर केला.

व्हिडिओमध्ये दिनेश कार्तिक विमानाच्या आत धुराच्या लोटातून बाहेर पडताना दिसला. दोन्ही बाजूला टीम इंडियाचे खेळाडू बसले होते. त्यांनी टाळ्या वाजवून दिनेश कार्तिकचे स्वागत केले.  धुराचे लोट येत असताना त्यातून कार्तिक स्टाईलने हसत पुढे आला आणि सर्वांचे आभार मानत आणि धमाल-मस्ती करत आला. यष्टीरक्षक-फलंदाजाने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'वायवा रूममधून (Viva Room) पहिला रोल नंबर असलेला विद्यार्थी बाहेर येत आहे असे वाटले.' यानंतर त्याने फायरचा इमोजीदेखील पोस्ट केला. दिनेश कार्तिकची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.  पाहा व्हिडीओ-

दरम्यान, दिनेश कार्तिक आयपीएल मधील खेळीमुळे चर्चेत होता. त्याच्या फॉर्मची चर्चा रंगली आणि त्यानंतर तो टीम इंडियात खेळण्यासाठी सज्ज झाला. मात्र आतापर्यंत टीम इंडियाकडून मोठी खेळी केलेली नाही. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सध्याच्या टी२० मालिकेत, त्याने आतापर्यंत तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फारशा धावा केलेल्या नाहीत. पण दुसऱ्या सामन्याच्या त्याने केलेल्या फटकेबाजी बरीच चर्चा होती.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकादिनेश कार्तिकभारतीय क्रिकेट संघसोशल मीडिया
Open in App