दुबई : केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकचे नेतृत्व धोक्यात असल्याचे भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर यांनी विधान करत सर्वांनाच धक्का दिला.
यूएईमध्ये २०१४ साली आयपीएल खेळवण्यात आले. त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपदाचा मान मिळवला होता. गावसकर यांनी केकेआरबाबत भाष्य करताना दिनेशला कर्णधार पदावरून काढले तर कोणाकडे नेतृत्व जाऊ शकते, हेदेखील स्पष्ट केले आहे.
ते म्हणाले, ‘केकेआर संघ लक्षवेधी आहे. त्यांच्याकडे आक्रमक फलंदाज आणि गोलंदाज आहेत. सामने जिंकण्यात सर्वजण योगदान देऊ शकतात. मागच्यावर्षी मात्र केकेआरला चांगली कामगिरी करता आली नव्हती. यंदा पहिल्या ४-५ सामन्यांमध्ये केकेआरला चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्यास कर्णधार बदलला जाईल.
नेतृत्व इयोन मोर्गनला मिळू शकते. मोर्गनकडे नेतृत्व करण्याचा चांगला अनुभव आहे. त्याच्या नेतृत्वात इंग्लंडने विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळे दिनेशकडून जर कर्णधारपद काढण्यात आले तर मोर्गन हा केकेआरचा नवा कर्णधार असू शकतो. दुसरीकडे नेतृत्व काढून घेतल्यानंतर कार्तिक फलंदाजीवर लक्ष केंद्रित करू शकेल व संघाला त्याचा लाभ होईल. संघात दिनेश आणि अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेल यांच्यामध्ये भांडण असल्याचेही पुढे आले होते. त्यामुळे या दोन्ही गोष्टींमुळे दिनेशचे कर्णधारपद धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे.
पॅट कमिन्सविषयी बोलताना गावसकर म्हणाले, ‘या खेळाडूवर ‘प्राईज टॅग’चे दडपण असेल. मोठी रक्कम मोजून खरेदी करण्यात आलेला हा खेळाडू अपयशी ठरल्यास संघाला मोठा फटका बसू शकतो.’
मला दडपणात खेळण्याची सवय : अय्यर
दुबई : आमच्या संघावर अशा स्थितीमध्ये दडपण येत नाही आणि आम्हाला अशा परिस्थितीत खेळण्याचा सराव आहे, अशी प्रतिक्रिया दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने व्यक्त केली. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध रविवारी सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने विजय साकारल्यानंतर तो बोलत होता. विजयानंतर प्रतिक्रिया देताना अय्यर म्हणाला, ‘सामन्यात अशा प्रकारचे चढ-उतार अनुभवणे कठीण होते, पण आमच्या संघाला त्याची सवय आहे.
Web Title: Dinesh Karthik's captaincy in jeopardy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.