ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली असताना जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यात मोठा पराक्रम झाला. ICC Men's T20 World Cup Sub Regional Africa Qualifier Group A सामन्यात युगांडा ( Uganda) संघानं प्रतिस्पर्धी लेसोथो ( Lesotho) संघाचा डाव २६ धावांवर गुंडाळून ३.४ षटकांत एकही फलंदाज न गमावता विजयी लक्ष्य पार केले. युगांडाच्या या विजयात भारतीय गोलंदाजाचा फार मोठा वाटा आहे. एकेकाळी सौराष्ट्रकडून खेळणाऱ्या दिनेश नक्रानीनं ( Dinesh Nakrani) या सामन्यात अफलातून कामगिरी करताना टीम इंडियाच्या दीपक चहर ( Deepak Chahar) याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
लेसोथोचा कर्णधार समीर पटेल ( १०) वगळता अन्य फलंदाजांना दुहेरी धावसंख्या करता आली नाही. तीन फलंदाज शून्यावर माघारी परतले. या सामन्यात दिनेशनं ४ षटकांत १ निर्धाव षटक फेकून ७ धावांत ६ विकेट्स घेतल्या. फ्रँक न्सुबुगा, हेन्री सेनीयोंडो व रिचर्ड अगामिरे यांनी प्रत्येकी एक विकेट घेत लेसोथोचा डाव १२.४ षटकांत २६ धावांवर गुंडाळला. दिनेशनं या कामगिरीसह दीपक चहरच्या ( ६-७ वि. बांगलादेश, २०१९) विक्रमाशी बरोबरी केली. युगांडानं हे लक्ष्य ३.४ षटकांत सहज पार केले. सौद इस्लामनं नाबाद १९ धावा केल्या.
दीपक चहरनं २०१९मध्ये बांगलादेशविरुद्ध ट्वेंटी-20तील कोणता विक्रम मोडला?
- ट्वेंटी-20त हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीय
- श्रीलंकेच्या अजंथा मेडिंसचा 8 धावांत 6 विकेट घेण्याचा विक्रम मोडला
- 6/7 - दीपक चहर वि. बांगलादेश, 2019
- 6/8 - अजंथा मेंडिस वि. झिम्बाब्वे, 2012
- 6/16- अजंथा मेंडिस वि. ऑस्ट्रेलिया, 2011
- 6/25 - युजवेंद्र चहल वि. इंग्लंड, 2017
ट्वेंटी-२० सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी कोणाच्या नावावर ( पुरुष/ महिला)
नेदरल्ँड्सच्या फ्रेडरीक ओव्हरडिकनं ICC Women's T20 World Cup Europe Region च्या फ्रान्सविरुद्ध २६ ऑगस्ट २०२१ ला झालेल्या सामन्यात ४ पैकी २ षटकं निर्धाव टाकली अन् ३ धावा देत ७ विकेट्स घेतल्या. ट्वेंटी-२०त ७ विकेट्स घेणारी ती पहिली खेळाडू ठरली. एकाही महिला व पुरुष गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नव्हती. फ्रेडरीकनं नेपाळच्या अंजली चंद व दीपक चहरचा विक्रम मोडला. अंजलीनं २०१९मध्ये २.१ षटकांत २ निर्धाव षटकं फेकताना एकही धाव न देता ६ विकेट्स घेतल्या होत्या. त्यापाठोपाठ मॅस एलिसानं ४-१-३-६ अशी आणि दीपक चहरनं ३.२-०-७-६ अशी कामगिरी केली होती.
Web Title: Dinesh Nakrani's 6/7 today for Uganda against Lesotho is the joint best bowling figures in men's T20Is, tied with Deepak Chahar (v BAN in 2019)
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.