मुंबई : ‘पुढील १८ महिन्यांमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची दिशा आणि दशा निश्चित होईल, असे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिका दौ-यावर रवाना होण्यापूर्वी शास्त्री यांनी कोहलीसह प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियासारख्या मजबूत संघाविरुद्धच्या आगामी दौ-यामध्ये कशाप्रकारे कामगिरी करावी हे सध्याच्या टीम इंडियाला चांगल्याप्रकारे माहित आहे. गेल्या काही वर्षांपासून मुख्य संघामध्ये फार काही बदल झालेले नाही आणि यामुळे पुढील आव्हानांचा सामना करण्यास खेळाडूंना मदत मिळेल. भविष्यात आम्हाला आॅस्टेÑलिया आणि इंग्लंडमध्येही सामने खेळायचे आहेत आणि मी सध्या इतकेच म्हणेल की, पुढील १८ महिन्यांनंतर हा संघ आणखी चांगला होईल.’
परदेशातील खेळपट्ट्यांवर खेळताना नेहमीच भारतीय फलंदाजांच्या क्षमतेवर चर्चा होते. याविषयी शास्त्री म्हणाले की, ‘जर आमच्या फलंदाजांना परदेशी खेळपट्ट्यांवर खेळणे अडचणीचे ठरत आहे, तर प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचणीत आणण्याचे आमचे काम आहे. हे आव्हानात्मक होईल.’
Web Title: The direction of the team will be in 18 months - Ravi Shastri
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.